पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करू शकतो निवडणूक आयोग

या निवडणुकांमध्ये लागणाऱ्या निर्णयांचा परिणाम पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे

या निवडणुकांमध्ये लागणाऱ्या निर्णयांचा परिणाम पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे

  • Share this:
    नवी दिल्ली, ०६ ऑक्टोबर २०१८- निवडणूक आयोग आज पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करू शकतो. राजस्थान, मध्य प्रदेश छत्तीसगड आणि मिजोरमसह तेलंगणामधील निवडणुक कार्यक्रमाची आज घोषणा केली जाऊ शकते. निवडणुक आयोगाने आज दुपारी १२ च्या सुमारास एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. या पत्रकार परिषदेतच आगामी विधानसभा निवडणुकांसंबंधीत अनेक घोषणा केल्या जाऊ शकतात. तेलंगणामध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होणार होत्या. मात्र, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी वेळेआधीच विधानसभा बरखास्त केली. ज्यामुळे तेलंगणामध्ये विधानसभेच्या ठरलेल्या वेळेआधीच निवडणुका होतील. पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांआधी या पाच राज्यांतील निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. या निवडणुकांमध्ये लागणाऱ्या निर्णयांचा परिणाम पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे. आता मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये भाजपची सत्ता आहे. तर मिजोरममध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तर तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समितीचं सरकार आहे. गडकरी म्हणतात, 'पवारसाहेब कधी काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही'
    First published: