नमो टिव्ही : मैं भी चौकीदार कार्यक्रमामुळं आयोग नाराज

नमो टिव्ही : मैं भी चौकीदार कार्यक्रमामुळं आयोग नाराज

निवडणुक आयोगानं सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडून नमो चॅनल संबंधित मागितले उत्तर.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आचारसंहिता लागू झाली असताना, नमो टिव्ही चॅनलच्या अडचणीत वाढ होणार आहे. नमो टिव्हीवर काही दिवसांपूर्वी दाखवण्यात आलेला मैं भी चौकीदार कार्यक्रमाविरोधात आप आणि काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडं तक्रार केली होती. त्यामुळं आता निवडणूक आयोगानं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उत्तर मागितले आहे. यासंदर्भात आयोगानं दूरदर्शनकडूनही उत्तर मागितले आहे.

मंगळवारी काँग्रेस पक्षानं नमो टिव्ही विरोधात तक्रार केली होती. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आपल्या तक्रारीत नमो चॅनल, लोकांच्या नावावर चालवले जात असून, या चॅनलद्वारे लोकांची दिशाभूल केली जात आहे, असे नमुद केले होते. दुरदर्शनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे करण्यात आलेले प्रक्षेपण यामुळं नमो टिव्हीसह दूरदर्शनच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी यांनी 31 मार्च रोजी आपलं निवडणुक मोहिमेच्या प्रसरणासाठी 24 X 7 टिव्ही चॅनल सुरू केले होते. दरम्यान हे चॅनल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या कक्षेत आहे की नाही, याबाबतही साशंकता आहे.

VIDEO : 'माझा मुलगा 24-25 वर्षांचा नाही, त्याला भाषणही करता येतं', विखेंचा पवारांना टोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2019 11:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading