'दहशतवाद्यांना बिर्यानी'च्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री योगी अडचणीत, EC ने बजावली नोटिस

'दहशतवाद्यांना बिर्यानी'च्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री योगी अडचणीत, EC ने बजावली नोटिस

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रिय निवडणूक आयोगाने (EC) नोटिस बजावली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,6 फेब्रुवारी: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रिय निवडणूक आयोगाने (EC) नोटिस बजावली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. शाहीन बाग येथील लोकांना बिर्यानी खाऊ घातल्यावरून मुख्यमंत्री योगींनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर टीका केली होती. दहशतवाद्यांना बिर्यानी खाऊ घातल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले होते. या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने त्यांनी नोटिस बजावून त्यांना शुक्रवारी सांयकाळी 5 वाजेपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एका जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर घणाघाती टीका केली होती. केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला स्वच्छ पाणी दिलं नाही. एका सर्व्हेचा दाखला देत दिल्ली सरकार राज्यातील जनताला दुषित पाणी उपलब्ध करून दित आहे. मात्र, आता हेच सरकार शाहीन बागमध्ये आंदोलन करत असून लोकांना बिर्यानी देत आहे.

First published: February 6, 2020, 10:26 PM IST

ताज्या बातम्या