• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • बंगालमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर! मतदानाच्या तारखांबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

बंगालमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर! मतदानाच्या तारखांबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे (West Bengal Assembly Election 2021) तीन टप्पे अजून बाकी आहेत. राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्यानं या तीन्ही टप्प्यातील निवडणुका एकत्र होतील, अशी चर्चा सुरु होती.

 • Share this:
  नवी दिल्ली, 16 एप्रिल: बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार (West Bengal Assembly Election 2021) जोरात सुरु आहे. त्याचवेळी राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे तीन टप्पे अजून बाकी आहेत. कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्यानं या तीन टप्प्यातील निवडणुका एकत्र होतील, अशी चर्चा सुरु होती. निवडणूक आयोगानं (Election Commission) ही शक्यता फेटाळली आहे. बंगाल विधानसभेच्या उर्वरित तीन टप्प्यांमध्ये 22, 26 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यांमधील निवडणुका एकत्र घेण्याची कोणतीही योजना नाही, असं निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यानं स्पष्ट केलं आहे. 'निवडणूक आयोगानं आज म्हणजेच शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यातील उरलेल्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासंबंधीच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. या बैठकीत काही राजकीय पक्षांकडून उरलेल्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जींनी केली होती मागणी कोरोना संकटामुळे उरलेल्या  टप्प्यातील मतदान एकदाच घ्यावं अशी मागणी करणारं पत्र बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं होतं. मात्र, निवडणूक आयोगानं याला नकार दिला. याच कारण हे आहे, की नामांकन माघारी घेण्याची शेवटची तारीख आणि मतदानाची तारीख यात कमीत कमी 14 दिवसांचं अंतर हवं. शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल होती. त्यामुळे, या टप्प्याचं मतदान 26 एप्रिलआधी होऊ शकत नाही. यामुळे मतदान लांबणीवर टाकणं शक्य आहे, मात्र अलीकडे आणणं शक्य नाही. बंगालमधील कोरोना व्हायरस रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळं निवडणूक आयोगानं सर्व स्टार प्रचार आणि प्रमुख नेत्यांना राजकीय प्रचारसभेत मास्क घालण्याची सूचना केली आहे. Covid-19 संदर्भात जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्स उल्लंघन केल्यास कडक करावाई करण्याचा इशारही आयोगानं दिला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: