मराठी बातम्या /बातम्या /देश /

Covid काळातल्या निवडणुका : असे असतील नियम, असं द्यावं लागेल मत

Covid काळातल्या निवडणुका : असे असतील नियम, असं द्यावं लागेल मत

सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कबरोबरच मतदारांसाठी हातमोजे बंधनकारक आणि उमेदवारांसाठी काही नवे नियम निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत.

सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कबरोबरच मतदारांसाठी हातमोजे बंधनकारक आणि उमेदवारांसाठी काही नवे नियम निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत.

सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कबरोबरच मतदारांसाठी हातमोजे बंधनकारक आणि उमेदवारांसाठी काही नवे नियम निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : Coronavirus ची साथ लवकर संपुष्टात यायची चिन्हं दिसत नाहीत. Unlock, Mission Begin Again या माध्यमातून आता दैनंदिन व्यवहार सुरू व्हायला लागले आहेत. या वर्षात होणाऱ्या निवडणुकासुद्धा (polls, by polls) घ्याव्या लागणार याला पर्याय नाही. पण साथकाळात निवडणुका कशा घ्यायच्या, प्रचार कसा करायचा, त्यासाठी काय नियम, आचारसंहिता, अटी असतील यासंबंधीची नवी नियमावली निवडणूक आयोगाने  (election commission of India) जाहीर केली आहे. महाराष्ट्रात या वर्षात काही महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. देशपातळीवर बिहार, पश्चिम बंगाल यांच्याही निवडणुका येऊ घातल्या आहेत. शिवाय काही पोटनिवडणुका बाकी आहेत. येणाऱ्या काळातील या सर्व निवडणुकांसाठी हीच नवी आचारसंहिता आणि नियमावली बांधील असेल. सध्या लागू असलेले सोशल डिस्टन्सिंगचे (social distancing) नियम निवडणुकांसाठीही असतील. शिवाय मास्क, सॅनिटायझर हेसुद्धा वापरणं बंधनकारक असेल. याशिवाय काही नव्या नियमांची भर निवडणूक आयोगाने यात घातली आहे. प्रचारासाठी 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जाता येणार नाही. उमेदवाराबरोबरही जास्तीत जास्त पाच कार्यकर्ते फिरू शकतील, अशा प्रचारासाठीच्या अटी आहेत. तर प्रत्यक्ष निवडणूक केंद्रावर प्रत्येक मतदाराला आत जाताना हातमोजे घालणं बंधनकारक करण्यात येणार आहे. कशी असेल निवडणूक? - उमेदवारांना उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरता येणार - सिक्युरिटी डिपॉझिट आणि प्रतिज्ञापत्रसुद्धा ऑनलाईन भरायची सोय - घराघरात जाऊन प्रचार करताना उमेदवारासमवेत जास्तीत जास्त 5 लोकांना जायची परवानगी असेल. - एका मतदान केंद्रावर फक्त 1000 मतदारांचीच सोय असेल. यापूर्वी 1500 मतदारांची नोंद एका बूथवर होत असे. - उमेदवाराने रोड शो किंवा सभा घ्यायच्या आधी त्या त्या क्षेत्रातल्या नियमांचं पालन करूनच आयोजन करावं. तिथेही सोशल डिस्टन्सिंग आवश्यक असेल. मतदारांसाठी नियम - सोशल डिस्टन्सिंग पाळूनच मतदान करता येणार - मतदान केंद्रावर जाताना फेस मास्क आवश्यक - प्रत्येक मतदाराला EVM मशीन हाताळण्यापूर्वी हातमोजे (gloves) घालायला देणार. - सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असेल.
First published:

पुढील बातम्या