आचारसंहिता : 25 दिवसांमध्ये 708 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

आचारसंहिता : 25 दिवसांमध्ये 708 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

महाराष्ट्रात एकूण 18 कोटी 37 लाखांची दारू पकडण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 एप्रिल : निवडणुकीच्या तोंडावर देशभर आचारसंहिता लागू आहे. मागच्या 25 दिवसात  जप्त केलेल्या पैशांचा आणि दारुचा आकडा ऐकला तर डोळे पांढरे होतील. आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या आचासंहिता पथकांनी देशभरात 400 कोटींची रोकड जप्त केलीय. तर तब्बल 708 कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले गेलेत. इतकंच नाही तर 163 कोटी रुपयांची दारूही देशातल्या वेगवेगळ्या भागातून जप्त करण्यात आलीय.

यासोबतच 318 कोटींचे मौल्यवान धातूही या काळात जप्त करण्यात आलेत. जप्त केलेल्या सगळ्या वस्तंची किम्मत तब्बल 1 हजार 589 कोटींच्या घरात जातेय. निवडणुकीची धामधूम अजून महिनाभर आहे. तेव्हा हा आकडा अजून किती कोटीच्या कोटी उड्डाण करेल याची फक्त कल्पना केलेलीच बरी.

हजारो कोटींचा मुद्देमाल जप्त

आचारसंहिता लागल्यापासून  देशाच्या वेगवेगळ्या भागात छापे मारून दीड हजार कोटी हून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडणूक आयोगानं ही माहिती दिली आहे. या जप्तीच्या कारवाईत सर्वाधिक रोख रक्कम आणि सोने तमिळनाडूत, सर्वाधिक दारू महाराष्ट्रात तर सर्वाधिक अंमली पदार्थ गुजरातमध्ये पकडण्यात आली आहेत.

छापेमारीत एकूण 356 रुपयांची रोख रक्कम, 300 कोटी रुपयांचे सोने चांदी आणि 696 कोटी रुपयांचे अमली पदार्थ आणि 150 कोटी रुपयांची दारू पकडण्या आली आहे. सर्वाधिक किंमतीचा मुद्देमाल गुजरात, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये पकडण्यात आला आहे.  देशात सर्वाधिक प्रमाणात दारू महाराष्ट्रात पकडण्यात आली आहे.

महाराष्ट्रात दारुचा महापूर

तमिळनाडूमध्ये 121 कोटी रुपयांची रोख रक्कम पकडली असून, त्याखालोखाल आंध्र प्रदेशमध्ये 95 कोटी रुपये व उत्तर प्रदेशमध्ये 22 कोटींची रोख रक्कम पकडण्यात आली आहे.

महाराष्ट्रात एकूण 18 कोटी 37 लाखांची दारू पकडण्यात आली आहे, तर गुजरातमध्ये सर्वाधिक किंमतीचे अंमली पदार्थ पकडण्यात आले आहे.

गुजरातमध्ये 100 किलो अंमली पदार्थ पकडली असून त्यांची किंमत तब्बल 500 कोटी इतकी आहे. गुजरातमध्येच सर्वाधिक संपत्ती म्हणजेच 510 कोटी रुपयांची संपत्ती पकडण्यात आली आहे. तमिळनाडूमध्ये सर्वाधिक सोने पकडण्यात आले त्याची किंमत तब्बल 135 कोटी इतकी आहे. तर आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक मोफत वाटण्याच्या वस्तू पकडण्यात आल्या आहेत त्यांची किंमत 10 कोटी 83 लाख

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 11:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading