‘गद्दारांना गोळ्या घाला…!’ म्हणणारे मंत्री अनुराग ठाकूर अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस

‘गद्दारांना गोळ्या घाला…!’ म्हणणारे मंत्री अनुराग ठाकूर अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस

वादग्रस्त घोषणा दिल्यानंतर भाजपच्या स्टार प्रचारक असलेल्या अनुराग ठाकूर आणि खासदार प्रवेश वर्मा यांच्याविरोधात आचारसंहिता भंगासंदर्भातला अहवाल निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोगाकडे सोपवला

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जानेवारी: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबायचं नाव घेत नाही. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 'गद्दारांना गोळ्या घाला..!' अशा वादग्रस्त घोषणा दिल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. निवडणूक आयोगानं ठाकूर यांना नोटीस पाठवून अनुराग ठाकूर आणि भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांच्याकडे उत्तर मागितलं आहे. अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मांना 30 जानेवारीपर्यंत नोटीसीला उत्तर द्यावं लागणार आहे. याआधी दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अनुराग ठाकूर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भातला अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला होता.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सीएएला विरोध करणाऱ्यांविरोधात तीव्र शब्दात टीका केली. त्यानंतर त्यांनी गर्दीसमोरच ‘देशातल्या गद्दारांना गोळ्या घाला’ असे नारे द्यायला लावल्याचा आरोप आहे. वादग्रस्त घोषणा दिल्यानंतर भाजपच्या स्टार प्रचारक असलेल्या अनुराग ठाकूर आणि खासदार प्रवेश वर्मा यांच्याविरोधात आचारसंहिता भंगासंदर्भातला अहवाल निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोगाकडे सोपवला आहे.

दिल्लीतले भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांनीही मंगळवारी भडकाऊ भाषण दिलं होतं. "कश्मीरमध्ये ते काश्मीरी पंडितांसोबत झालं ते दिल्लीतही होऊ शकतं. शाहीन बागमध्ये जे हजारो लोक एकत्र आलेत ते  तुमच्या घरात घुसतील. तुमच्या आया बहिणींवर, मुलींवर बलात्कार करतील. त्यांची हत्या करतील. त्यामुळे आता निर्णय लोकांना करायचा आहे." असं वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदारानं केलं. एवढंच नाही तर भाजप सरकारमध्येच तुमच्या घरातल्या व्यक्ती सुरक्षित राहातील असंही सांगितलं.

निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रवेश वर्मा यांच्याबद्दल पाठवलेल्या अहवालात धार्मिक भावना भडकवल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांच्याही अडचणी वाढणार आहेत. दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारीला मतदान होणारय. त्यामुळे सध्या प्रचारानं वातावरण चांगलंच तापलंय. यात धार्मिक भावना भडकवणाऱ्या या वादग्रस्त वक्तव्यांची जणू मालिकाच सुरु  झालीय. आता सगळ्यांची नजर आहे ती निवडणूक आयोगाच्या कारवाईकडे. दिल्लीत 8 तारखेला मतदान होणार आहे तर 11 फेब्रुवारीला दिल्लीच्या सत्तेचा फैसला होणार आहे.

अन्य बातम्या

हिंदी महासागरात चीनची घुसखोरी, भारतानं तैनात केली युद्धनौका!

VIDEO...तर भारतीय लष्कर पाकिस्तानला दहा दिवसांत पराभूत करेल - PM मोदी

आसाम तोडण्याची भाषा करणाऱ्या शरजील अटक; शाहीन बागच्या CAA विरोधी आंदोलनात सहभाग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2020 10:00 PM IST

ताज्या बातम्या