भारतातल्या एकमेव मतदारसंघात EVM नाही तर बॅलेट पेपरद्वारे होणार मतदान

भारतातल्या एकमेव मतदारसंघात EVM नाही तर बॅलेट पेपरद्वारे होणार मतदान

हैद्रबादमध्ये आता बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान होणार आहे.

  • Share this:

हैद्राबाद, 30 मार्च : EVM मशीनला विरोधकांनी विरोध केला आहे. त्यांनी मतदानाकरता बॅलेट पेपरचा वापर करावा अशी मागणी केली आहे. पण, त्यानंतर देखील लोकसभा निवडणुका या EVM वर पार पडणार आहेत. दरम्यान, देशातील असा एक मतदार संघ आहे ज्या ठिकाणी EVM नाही तर बॅलेट पेपरवर निवडणुका पार पडणार आहेत. हैद्राबाद! हाच तो मतदारसंघ होय. या मतदारसंघात बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी या मुलगी हैद्राबादमधून निवडणुकीच्या रिंगणात आहे. विशेष बाब म्हणजे तब्बल 185 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यापैकी 178 हे शेतकरी आहेत. केवळ 64 उमेदवारांसाठीच EVMचा वापर शक्य आहे. त्यामुळे आता बॅलेट पेपरवर मतदानाचा निर्णय हा निवडणूक आयोगानं घेतला आहे. गुरूवार पर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख होती. पण, अर्ज मागे घेण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला. परिणामी, आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी कलवकुंतला कवितासाठी विजय मिळवणं सोपी गोष्ट नाही.


शेतकरी का आहेत निवडणुकीच्या आखाड्यात

कलवकुंतला कविता विरोधात तब्बल 700 शेतकऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये हळद आणि ज्वारी उत्पादन करणारे जवळपास 200 शेतकरी होते. महत्त्वाची बाब म्हणजे कलवकुंतला कविता यांनी 'शेतकऱ्यांनी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करा. त्यामुळे त्यांना तुमच्या समस्यांची जाणीव त्यांना होईल' असं आवाहन केलं होतं. पण, त्यांचं हे आवाहन त्यांच्याविरोधात उलटलं असून त्यांच्याच विरोधात शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले. परिणामी आता निकालाकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.


लोकलमधून उतरताना प्लॅटफॉर्मवर पडला; ह्रदयाचा ठोका चुकविणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2019 09:52 AM IST

ताज्या बातम्या