मराठी बातम्या /बातम्या /देश /

मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याची मोहीम आजपासून सुरू; नाही केलं तर काय होईल?

मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याची मोहीम आजपासून सुरू; नाही केलं तर काय होईल?

निवडणूक कायदा (सुधारणा) विधेयक, मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करण्यास अधिकृत करते. डिसेंबर 2021 मध्ये ते लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. ही प्रोसेस जाणून घ्या.

  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) आजपासून अनेक राज्यांमध्ये मतदार ओळखपत्र (Voter ID Card) आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक करण्याची मोहीम सुरू केली आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, मतदाराची ओळख पटवून देण्यासाठी आणि मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करण्याच्या उद्देशाने मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंकिंग केले जात आहे.

डिसेंबर 2021 मध्ये हे विधेयक लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले

निवडणूक कायदा (सुधारणा) विधेयक, मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करण्यास अधिकृत करते. डिसेंबर 2021 मध्ये ते लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.

लिंकिंग प्रक्रिया पूर्णपणे ऐच्छिक आहे

मनीकंट्रोलच्या बातमीनुसार, महाराष्ट्र आणि झारखंडसारख्या राज्यांमध्ये निवडणूक आयोगाची विशेष मोहीम सुरू आहे. ही लिंकिंग प्रक्रिया पूर्णपणे ऐच्छिक आहे. मतदारांना लिंक करण्याची सक्ती केली जाणार नाही.

आजपासून काय स्वस्त, काय महाग? कोणते नियम बदलले, चेक करा

NVSP वेबसाइटवर नोंदणी करा

आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी, प्रथम NVSP पोर्टलवर (National Voter’s Service Portal) - www.nvsp.in वर नोंदणी करावी लागेल. वेबसाइटवर जा आणि नवीन वापरकर्ता (New User) पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर मोबाईल नंबर आणि तुमचा कॅप्चा टाका. आता मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो प्रविष्ट करा. तुम्ही ते प्रविष्ट करताच, तुमच्या समोर एक पेज उघडेल, ज्यामध्ये तुमची सर्व माहिती प्रविष्ट करा. आता सबमिट बटणावर क्लिक करून तुमची सर्व माहिती नोंदणीकृत होईल. मतदार यादी आधार कार्डशी लिंक करण्याचे काम 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करायचे आहे.

मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया

NSVP पोर्टलच्या होम पेज वर, मतदार यादीवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा मतदार आयडी किंवा EPIC क्रमांक (EPIC NO.) आणि तुमच्या राज्याचा तपशील एंटर करा. आता फीड आधार क्रमांक उजव्या बाजूला दिसेल. यावर क्लिक केल्यावर एक नवीन विंडो उघडेल. ज्यामध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड तपशील आणि EPIC क्रमांक टाका. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडीवर ओटीपी येईल. तुम्ही तो प्रविष्ट करताच, आधार आणि मतदार ओळखपत्र लिंकिंगवर एक सूचना स्क्रीनवर दिसेल.

First published:

Tags: Aadhar card link, Voting