बक्कळ पैसा वापरल्याने इथे निवडणूकच झाली रद्द, आयोगाची कारवाई

बक्कळ पैसा वापरल्याने इथे निवडणूकच झाली रद्द, आयोगाची कारवाई

या लोकसभा निवडणुकीत देशभरात तब्बल अडीच हजार कोटींचा मुद्देमाल जप्त झाला आहे. त्यात दीड हजार कोटींची रोकड आहे. पैशाच्या अतिवापरामुळे तामिळनाडूमधल्या वेल्लोरची निवडणूकच रद्द झाली आहे.

  • Share this:

चेन्नई, 16 एप्रिल : या लोकसभा निवडणुकीत देशभरात तब्बल अडीच हजार कोटींचा मुद्देमाल जप्त झाला आहे. त्यात दीड हजार कोटींची रोकड आहे. राजकीय पक्षांचं हे 'लक्ष्मीदर्शन' काही पक्षांना मात्र चांगलंच भोवलं आहे.

पैशाच्या अतिवापरामुळे तामिळनाडूमधल्या वेल्लोरची निवडणूकच रद्द झाली आहे. द्रमुकच्या एका उमेदवाराकडे प्रचंड पैसे सापडल्यानंतर वेल्लोरमध्ये पैशाचा अतिवापर होत असल्याचं समोर आलं.त्यानंतर निवडणूक आयोगाने इथली निवडणूक रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याला राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे.

18 एप्रिलला होतं मतदान

मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशाचा वापर होत असल्याबद्दल निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला वेल्लोरमध्ये मतदान होणार होतं.

द्रमुकचे नेते कथिर आनंद आणि पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांविरुद्ध मतदारांना पैसे वाटल्याबद्दल तक्रार करण्यात आली होती. पोलीस आणि इनकम टॅक्स विभागानेही याबद्दलचा अहवाल दिला होता.

वेअर हाऊसमध्ये सापडली रोकड

कथिर आनंद या उमेदवाराच्या वेअरहाऊसमधून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कथिर आनंद यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, आपल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांच्या दोन कार्यकर्त्यांवर लाचखोरीचा आरोप ठेवण्यात आला आहे.

राष्ट्रपतींना पत्र

वेल्लोरची निवडणूक रद्द करावी, अशा आशयाचं पत्र निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींना लिहिलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निवडणूक आयोगाच्या या कारवाईला मान्यता दिल्यामुळे आता वेल्लोरला निवडणूकच होणार नाही. निवडणूकच रद्द झाली तर याठिकाणी उमेदवार निवडीबदद्ल काय निर्णय घेणार की ही निवडणूक पुढे ढकलणार याबद्दल मात्र अजून काही कळू शकलेलं नाही.

===========================================================================================================================================================================================

VIDEO : सुशीलकुमार शिंदे झाले भावुक, निवडणुकांबद्दल घेतला मोठा निर्णय

First published: April 16, 2019, 8:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading