कर्नाटकात भाजप की काँग्रेस?

कर्नाटक विधानसभेसाठी गेली महिनाभर सुरू असलेला घनघोर प्रचार काल संध्याकाळी 5 वाजता संपला. भाजप आणि काँग्रेसनं आपली सर्व शक्ती या प्रचारात पणाला लावली होती.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 11, 2018 08:33 AM IST

कर्नाटकात भाजप की काँग्रेस?

11 मे : कर्नाटक विधानसभेसाठी गेली महिनाभर सुरू असलेला घनघोर प्रचार काल संध्याकाळी 5 वाजता संपला. भाजप आणि काँग्रेसनं आपली सर्व शक्ती या प्रचारात पणाला लावली होती. कुठल्याही परिस्थितीत सत्ता खेचून आणायची अशा जिद्दीनं भाजपनं प्रचार केला तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपला कर्नाटक विजय सोपा असणार नाही हे आपल्या प्रचार कौशल्यानं दाखवून दिलं.

भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, तर काँग्रेसकडून राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग अशी सर्व दिग्गज नेत्यांनी कर्नाटकातला कानाकोपरा पिंजून काढला. प्रचारांसोबत आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पाडला आणि मतदारांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी चढाओढही झाली.

आपल्या 5 वर्षांच्या कार्यकाळाचा बचाव करत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष हा अनैतिक, कनिष्ठ आणि सगळ्यांमध्ये फुट पाडणारा असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली. या निवडणुकांच्या आखाड्यात भाजपनेही काँग्रेस फुट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली.

तर दुसरीकडे या आखाड्यातले तिसरे खिलाडी म्हणजे जेडीएस यांनीदेखील सिद्धरामय्या यांच्याविरोधात जोरदार ताकद लावली. तर जेडीएस यांची भाजपसोबत छुपी असल्याचा आरोप सिद्धरामय्या यांच्याकडून करण्यात आला होता. भाजप आणि जेडीएस यांच्यावर मात करण्यासाठी सिद्धरामय्या यांनी सगळ्यांना मागे सारत काँग्रेसचं नेतृत्व केलं तर भाजपकडून थेट पंतप्रधानच मैदान लढताना दिसले.

भाजपचे अमित शहा तर गेल्या महिनाभरापासून कर्नाटकात तळच ठोकून होते. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी जोरदार खिंड लढवत भाजपच्या दिग्गज नेत्यांची दमछाक केली. राहुल गांधी यांनी किमान 100 दिवसांपर्यंत प्रचार केला आणि किमान 100 छोट्या-मोठ्या रॅली काढल्या. गाव-खेडीपासून ते सगळ्या मंदिरं आणि मठांमध्ये राहुल गांधींनी दौरा केला. पण यात सगळ्यात सिद्धरामय्या हे या सगळ्या प्रचारसभांचा मुख्य चेहरा होते.

Loading...

भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येदियुरप्पा हे निवडणुक जिंकण्याच्या अपक्षेत आहेत. 17 तारखेला ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी प्रतिक्रिया त्यांनी न्यूज 18शी बोलताना दिली. पण आता या निवडणुकांचा निकाल काय लागणार? कोण बाजी मारणार याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे.

आता कर्नाटकची जनता 12 मे रोजी ईव्हीएम मशिनचं बटण दाबून उमेदवारांचं भवितव्य कैद करणार आहे. तर कर्नाटकच्या जनतेनं कुणाच्या बाजूनं कौल दिलाय हे 15 मे रोजी स्पष्ट होईल.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 11, 2018 08:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...