भाजपला त्रिपुरासारखं यश बंगालमध्ये मिळवून देणार का 'हा' मराठी माणूस?

भाजपला त्रिपुरासारखं यश बंगालमध्ये मिळवून देणार का 'हा' मराठी माणूस?

भाजपला हिंदीभाषक मध्य भारतापेक्षा या वेळी पूर्वेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अमित शहांनी बंगाल सर करण्यासाठी एका खास कार्यकर्त्याची नेमणूक केली आहे.

  • Share this:

कोलकाता, 13 मे : गेल्या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या त्रिपुराच्या निवडणुकीत भाजपला मोठं ऐतिहासिक यश मिळालं. पहिल्यांदाच ईशान्येच्या या राज्यात भाजपची सत्ता आली. या यशाच्या शिल्पकारांपैकी एक मराठमोळं नाव होतं सुनील देवधर यांचं. आता त्रिपुराच्या यशानंतर बंगालची लढाई सर करण्याची जबाबदारी पक्षाने देवधर यांच्यावर सोपवली आहे.

सुनील देवधर भाजपचे सचिव आहेत. त्यांच्यावर यंदा त्रिपुराबरोबरच आंध्र प्रदेशची जबाबदारी देण्यात आली होती. तिथलं मतदान झाल्यानंतर देवधर यांनी आपला मोर्चा बंगालकडे वळवला आहे. शेवटच्या दोन टप्प्यातल्या मतदानाआधी देवधर कोलकात्याला पोहोचले. त्यांच्यावर शेवटच्या टप्प्यातल्या 9 जागांची जबाबदारी आहे. त्यातही कोलकात्याच्या चार जागा आहेत. उत्तर कोलकाता, दक्षिण कोलकाता आणि जाधवपूर या तीन जागांवर भाजपने अधिक लक्ष द्यायचं ठरवलं आहे. त्यासाठी खास देवधर यांची नेमणूक केल्याचं समजतं. या तीनही जागा मागच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने जिंकल्या होत्या. तृणमूलच्या बालेकिल्ल्याला धक्का लावायची भाजपची नीती आहे.

"त्रिपुरासारखी निवडणूक आडाखे इथे चालणं अवघड आहे, कारण तेवढा वेळ बंगालमध्ये मिळालेला नाही. इथे ममा बॅनर्जी स्वतःच आमच्या विजयाचा मार्ग सोपा करत आहेत", असं सुनील देवधर माध्यमांशी बोलताना सांगितलं.

ममता बॅनर्जींचं अमित शहांना 'टशन'; रॅलीची परवानगी केली रद्द

लोकसभेच्या 6व्या टप्प्यातही रेकॉर्ड मतदान, प.बंगाल 80.35 टक्के

2018 मध्ये झालेल्या पालिका, जिल्हा परिषदांच्या पंचायत निवडणुकीत भाजप पहिल्यांदाच बंगाल प्रांतात दुसऱ्या क्रमांकाची पार्टी ठरली होती. पंचायत निवडणुका तृणमूलनं जिंकल्या असल्या तरी भाजपलाही लक्षणीय मतं मिळाली होती. त्यामुळे या वेळी भाजपनं पश्चिम बंगालमध्ये विशेष लक्ष केंद्रित केलं आहे आणि अमित शहांनी सुनील देवधरांसारखा खास माणूस कोलकात्याला पाठवला आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

कोण आहेत सुनील देवधर?

त्रिपुरात 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच कमळ उमललं, त्याचं मोठं श्रेय सुनील देवधर यांच्या संघटन कौशल्याला देण्यात आलं. या छोट्या राज्याच्या निवडणुकीत विधानसभेच्या 59 पैकी 36 जागा जिंकत भाजपची सत्ता आली. भाजपच्या या विजयामध्ये सुनील देवधर यांचं महत्त्वाचं योगदान आहे.

सुनील देवधर यांचा जन्म मुंबईत झाला. लहानपणापासून संघाच्या शिस्तीत वाढलेल्या देवधरांनी तब्बल 12 वर्षं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणूनही देशाच्या विविध भागात काम केलं.

शिवाय, बंगाली भाषेसह इतर अनेक भाषांवर देवधर यांचं प्रभुत्व आहे. मेघालय, त्रिपुरा, नागालँडमधील खासी आणि गारो सारख्या स्थानिक जातींमधील लोकांत त्यांच्या चांगला जनसंपर्क आहे..

'मी श्रीरामाचा जयजयकार करणार; हिंमत असेल तर ममतांनी अटक करावी'

ममता की मोदी, कोण जिंकणार पश्चिम बंगाल? पाहा हा SPECIAL REPORT

त्यांनी प्रचारासाठी स्थानिक भाषा शिकून घेतल्या. 2005 पासून 'माय होम इंडिया'च्या नावानं एक स्वयंसेवी संस्थादेखील सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून ईशान्य भारतातील नागरिकांना सर्वप्रकारची मदत केली जाते आणि याचाच फायदा भाजपला झाल्याचं म्हटलं जातं. अंधेरीमध्ये घर असलेल्या 52 वर्षीय देवधरांनी आता ईशान्य भारतालाच आपलं घर मानलं आहे.

सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी प्रत्येक संघ स्वयंसेवकानं देशासाठी एक वर्ष द्यावं असं आवाहन केलं होतं त्याला प्रतिसाद देत देवधरांनी इशान्येकडील राज्यांत कामाला सुरुवात केली आणि पुढे अविवाहित राहून तिथे काढण्याचं ठरवलं.

First published: May 13, 2019, 5:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading