VIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार?

आपल्या एका मताने काय फरक पडणार आहे, असा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पाहा

News18 Lokmat | Updated On: Apr 20, 2019 08:24 PM IST

VIDEO प्रत्येक मत का महत्त्वाचं आहे आणि त्यानं काय फरक पडणार?

मुंबई, 20 एप्रिल : निवडणुकीचा हंगाम आहे. नवीन सरकार कसं असेल, कोण निवडून येणार याच्या चर्चा कोपऱ्या-कोपऱ्यावर सुरू आहेत. पण तरीही या तापलेल्या वातावरणातही काही जण असतीलच जे मतदार केंद्रापर्यंत जाण्यासाठी उत्सुक नसतील. त्यांनी कदाचित 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळीही काही कारणं पुढे करत मतदान करणं टाळलं असेल.

84.3 कोटी मतदारांपैकी फक्त 66% लोकांनी मतदान केलं होतं. 34% लोकांनी आपलं मूल्यवान मत न देता दुसऱ्यांच्या भरवशावर आपल्या देशाचं भविष्य सोडून दिलं होतं.

आता 2019 च्या निवडणुकीसाठी देशभरात 90 कोटी मतदार आहेत. संसदीय लोकशाही इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने मतदार असण्याची ही ऐतिहासिक वेळ आहे. या वेळी मतदानाची टक्केवारी सर्वाधिक असण्याची शक्यता आहे. या वेळी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांची संख्या लक्षणीय आहे, त्यामुळे मतदानाची टक्केवारी गेल्या वेळच्या 66 टक्क्यांहून बरीच जास्त वाढण्याची शक्यता आहे. पण तरीही फक्त टक्का वाढून भागणार नाही. सरकारने देशाच्या भल्यासाठी 100 टक्के काम करावं अशी अपेक्षा करण्याआधी आपण सरकार आणण्यासाठी 100 टक्के मतदान करू शकत नाही?

आपल्या एका मताने काय फरक पडणार आहे, असा विचार कधीच करू नका. कारण आपली एकात्मता आणि वैविध्य हीच वैशिष्ट्य आहेत. आपला भविष्यकाळ सुरक्षित करण्यासाठी आपण मौल्यवान मत दिलंच पाहिजे. आपल्या देशाला उज्ज्वल भवितव्याकडे घेऊन जाणारा रस्ता आपल्या मतदानाच्या पहिल्या पायरीपासून सुरू होतो, हे दाखवणारा हा प्रेरणादायी व्हिडिओ पाहा.


Loading...

<Video embedded>


नेटवर्क 18 आणि HDFC Life यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू केला आहे. उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सजगपणे मतदान करून आपले नेते निवडावे, असा यामागचा उद्देश आहे. आपल्या सर्वांना... तुम्हाला आणि इतरांनाही याची गरज आहे. #AajSawaaroApnaKal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 20, 2019 08:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...