Lok Sabha Election 2019 : या एका मतदारासाठी उघडणार मतदान केंद्र

Lok Sabha Election 2019 : या एका मतदारासाठी उघडणार मतदान केंद्र

निवडणूक आयोगाने देशात एका ठिकाणी केवळ एकाच मतदारासाठी बूथ लावण्याचं ठरवलं आहे हे ऐकून आश्चर्य वाटेल. एकमेव मतदारासाठी 5 निवडणूक कर्मचाऱ्यांचं अख्खं पथक त्या केंद्रावर असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 10 एप्रिल : सतराव्या लोकसभा निवडणुकीला खऱ्या अर्थाने गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्पाचं मतदान 11 एप्रिलला होईल. त्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. देशभरात 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पात्र असलेले 90 कोटी मतदार आहेत. त्यातले जवळपास सव्वा कोटी मतदार तरुण आहेत आणि पहिल्यांदाच मत देणार आहेत.

त्या त्या मतदारसंघातल्या लोकसंख्येनुसार मतदान केंद्रांची संख्या ठरवण्यात आली आहेत. पण निवडणूक आयोगाने देशात एका ठिकाणी केवळ एकाच मतदारासाठी बूथ लावण्याचं ठरवलं आहे हे ऐकून आश्चर्य वाटेल. गुजरातमधल्या जुनागड जिल्हा प्रशासनाने ज्या एकमेव मतदारासाठी मतदान केंद्र सुरू केलं आहे, तो एका मंदिरातला पुजारी आहे. गिरच्या जंगलात बाणेज नावाच्या गावात हे मतदान केंद्र असेल. गुरू भरतदास या एकमेव मतदारासाठी 5 निवडणूक कर्मचाऱ्यांचं अख्खं पथक त्या केंद्रावर असणार आहे.

गुरू भरतदास हे मूळचे राजस्थानातले असून, शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. गेली 15 वर्षं ते गिरच्या जंगलात बाणेज गावातल्या एका पुरातन मंदिरातच वास्तव्याला आहेत. ते या गावातले एकमेव अधिकृत मतदार आहेत.

VIDEO: निवडणूक चिन्हाचा असाही प्रचार; बॅटच्या आकारात केली पिकाची कापणी

First published: April 10, 2019, 4:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading