...म्हणून काँग्रेस सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला : प्रियंका चतुर्वेदी

...म्हणून काँग्रेस सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला : प्रियंका चतुर्वेदी

काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देताना प्रियंका चतुर्वेदी यांनी हा निर्णय़ घेताना वाईट वाटत असल्याचे म्हटले आहे.

  • Share this:

मुंबई, 19 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे दोन टप्पे पूर्ण झाले असताना काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका गांधींच्या राजीनाम्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. पक्षात गुंडांना प्राधान्य दिले जात असल्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. राजीनामा दिल्यानंतर प्रियंका चतुर्वेदींनी ट्विटर प्रोफाईलमधून काँग्रेस प्रवक्ता असल्याचं काढून टाकलं आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीकडे सोपवलेल्या राजीनाम्यात प्रियंका चतुर्वेदींनी हा निर्णय घेताना वाईट वाटत असल्याचे म्हटले आहे. मात्र, पक्षासाठी करत असलेल्या कामाची किंमत नसल्याने या निर्णयापर्यंत पोहचावं लागल्याचं चतुर्वेदी यांनी राजीनाम्यात नमूद केलं आहे.

प्रियंका चतुर्वेदी या 10 वर्षांपूर्वी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षात आल्या होत्या. आता काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम पाहत होत्या.

नेमकं काय झालं?

काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी सप्टेंबर 2018मध्ये राफेलच्या भ्रष्टाचारावर मथुरा इथं पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं होतं. त्यानंतर पक्षाने त्यांना निलंबित केलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व कार्यकर्त्याचं निलंबन पक्षाने मागे घेतलं. त्यामुळे प्रियंका दुखावल्या गेल्या आणि त्यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्षासाठी शिवीगाळ सहन केली, ट्रोलिंग सहन केलं, घाम गाळला, मात्र आपल्यासोबत दुर्व्यवहार करणाऱ्यांना कुठलीही शिक्षा न करता त्याचं निलंबन मागे घेण्यात आलं हे अतिशय दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केली होती.

काय आहे हे प्रकरण?

राफेल करारावरून प्रियंका चतुर्वेदी यांनी मथुरेत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केले होते. या घटनेनंतर संबंधित नेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर या नेत्यांना पुन्हा पक्षात स्थान देण्यात आले आहे. प्रियंका यांनी पक्षाला लिहलेल्या पत्रात याचा उल्लेख केला आहे.

सर्वच पक्ष सारखे

निवडणुका असल्याने मतांसाठी राजकीय पक्ष कुठल्याही थराला जातात. प्रियंका या काँग्रेसच्या ज्येष्ठ प्रवक्त्या आहेत. त्यांच्याशी वाईट वागणाऱ्या लोकांना पुन्हा पक्षात घेत असतील तर ते अतिशय चुकीचं असल्याचं मत पत्रकार रामकृपाल सिंह यांनी व्यक्त केलं. मतांसाठी राजकीय पक्ष काहीही करायला तयार होतात असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

VIDEO : '3 नार्को टेस्ट झाल्या, 24 दिवस काही न खाता राहिले पण...' साध्वी प्रज्ञा झाल्या भावुक

First published: April 19, 2019, 12:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading