उतार वयात मुलांनी घराबाहेर काढलं, हार न मानता आजीबाईंनी जिंकली 100 मीटर वॉक रेस

उतार वयात मुलांनी घराबाहेर काढलं, हार न मानता आजीबाईंनी जिंकली 100 मीटर वॉक रेस

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये वृद्धांनी एल्डर्स डे निमित्त घेण्यात आलेल्या वॉक रेसमध्ये उत्स्फुर्तपणे भाग घेत फिटनेससाठीही वयाचं बंधन नसतं हे दाखवून दिलं.

  • Share this:

कर्नाटक, 26 सप्टेंबर : प्रेमासाठी वयाचं बंधन नसतं असं म्हटलं जात असलं तरीही कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये वृद्धांनी एल्डर्स डे निमित्त घेण्यात आलेल्या वॉक रेसमध्ये उत्स्फुर्तपणे भाग घेत फिटनेससाठीही वयाचं बंधन नसतं हे दाखवून दिलं. कर्नाटक सरकारनं एल्डर्स डेचं औचित्य साधत 100 आणि 200 मीटर चालण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं.

या स्पर्धेत जवळपास 250 वृद्ध व्यक्तींनी सहभाग घेतला होता. या वॉक रेसमध्ये 81 वर्षीय आजीबाई ललिथाम्मा यांनी 200 मीटरची स्पर्धा जिंकली. तर 72 वर्षीय सरोजाम्मा यांनी 100 मीटरच्या स्पर्धेत बाजी मारली. 1 ऑक्टोबरला एल्डर्स डे साजरा केला जातो. त्यानिमित्त कर्नाटकच्या कांतिवारा स्टेडिअममध्ये वृद्धांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.

ही 5 फळं कॅन्सरला ठेवू शकतील कायमचं दूर

या स्पर्धेत 200 मीटर चालण्याची शर्यत जिंकणाऱ्या ललिथाम्मा या निवृत्त शिक्षिका आहेत. तरुण वयात त्यांनी मैदानी खेळांमध्ये अनेक मेडल्स जिंकली आहेत. ही स्पर्धा जिंकल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत ललिथाम्मा सांगतात, मी रोज कमीत कमी एक तास चालते. मला वाटतं यामुळेच मी ही स्पर्धा जिंकू शकले आहे. या वयात फिट राहणं सोपं नाही पण जर तुमचं तुमच्या मेंदूवर नियंत्रण असेल तर बऱ्याच गोष्टी शक्य आहेत.

Research: ...म्हणून विवाहबाह्य संबंधांत पुरुषांपेक्षा महिला असतात जास्त आनंदी

याशिवाय 100 मीटर चालण्याच्या स्पर्धेत 72 वर्षीय सरोजाम्मा यांनी बाजी मारली. टाइम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सरोजाम्मा गुढग्यांना पट्टी बांधून या स्पर्धेत उतरल्या होत्या. त्या सांगतात, मला माझ्या मुलांनी सोडून दिलं आहे. त्यांना जे हवं होतं ते त्यांना मिळालं पण मी मात्र इथं आहे. अशाप्रकारच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन मी स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

या स्पर्धेत भाग घेतलेल्या बहुतांश स्पर्धकांची कथा सारखी होती. अनेकांना उतार वयात त्यांच्या मुलानी सोडून दिलेलं आहे. मात्र अशाप्रकारच्या स्पर्धांमध्ये किंवा इव्हेंटमध्ये भाग घेत ते स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

कम बॅकसाठी सानिया मिर्झा तयार, अवघ्या काही महिन्यांत कमी केलं 26 किलो वजन

================================================================

VIDEO: मुसळधार पावसामुळे कऱ्हा नदीचं रौद्र रूप; जनावरांसह ग्रामस्थांचं स्थलांतर

First published: September 26, 2019, 1:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading