नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : आई लहान भावाचा जास्त लाड करते आणि मोठ्या भावाचा कमी लाड करते आणि म्हणून भावंडांत वाद होणं ही प्रत्येक घरातली कहानी आहे. अशाच वादात मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने वार करत त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीला नेहमी वाटायचं की, त्याची आई आपल्या धाकट्या भावावर जास्त प्रेम करते. याबद्दल त्याने त्याच्या आईशी अनेकदा भांडणंही केली. लहान भावाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याची हत्या केली आहे. याप्रकरणी मोती नगर पोलीस ठाणे तपास करत आहे. तर आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पश्चिम दिल्लीच्या बसई दारापूर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मृताचं नाव आनंद तिवारी (वय 22) असं आहे. तर आरोपीच्या मोठ्या भावाचं नाव अमित तिवारी (वय 25) असं आहे. त्यांचे कुटुंब वसई दारापूर इथे राहते. ते मूळचे उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर जिल्ह्यातील आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित हा नेहमी त्याची आई शांती देवी यांच्याशी वाद घालायचा. तु माझ्यापेक्षा आनंदवर जास्त प्रेम करते असा तिच्यावर आरोप करायचा. यावरून त्यांच्यात नेहमी भांडणं व्हायची.
इतर बातम्या - समुद्राचा VIDEO शूट करणाऱ्या मुलीच्या कॅमेऱ्यात कैद झाला वडिलांचा मृत्यू
गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अमितने याच गोष्टीवरून आईशी भांडण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याचा छोटा भाऊ आनंद कामावर गेला होता. जेव्हा तो रात्री कामावरून परत आला तेव्हा त्याच्या आईने त्याला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आनंद मोठ्या भावाला समजावण्याचा प्रयत्न करतो की आई दोघांवरही समान प्रेम करते, परंतु अमित हे समजण्यास तयार नव्हता.
इतर बातम्या - लाडक्या लेकीनेच वडिलांना केलं ब्लॅकमेल, 2 कोटींसाठी केला नात्याचा विश्वासघात!
जोपर्यंत भाऊ मरत नाही तोपर्यंत मारत राहिला...
आनंदने खूप समजवल्यानंतरही अमितने काही ऐकलं नाही आणि रागात त्याने आनंदला जीवे मारलं. त्याने धारदार शस्त्राने आनंदच्या पोटात वार केले. अमित एवढ्यावरच थांबला नाही तर जोपर्यंत आनंद मेला हे समजत नाही तोपर्यंत त्याने त्याच्यावर वार केले. जेव्हा आनंदचा मृत्यू झाला तेव्हा त्याला समाधान झालं. हा सगळा प्रकार झाल्यानंतर आरोपी अमितने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित हा मद्यपान करायचा. भावाची हत्या केल्यापासून तो फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.
पवार कुटुंबात खरंच गृहकलह? मनोहर जोशी काय म्हणाले, पाहा UNCUT VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा