आयुष्य एकत्र जगले अन् मरणही सोबतच आलं! धाकट्या भावाच्या मृत्यूनंतर थोरल्यानेही सोडले प्राण

आयुष्य एकत्र जगले अन् मरणही सोबतच आलं! धाकट्या भावाच्या मृत्यूनंतर थोरल्यानेही सोडले प्राण

कोणत्याही कारणानं कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू (Death) झाला तर त्याचं दुःख आभाळाएवढं असतं. हा धक्का कधीकधी इतका तीव्र असतो की नातलगांना हे दु:ख सहन करणं कठीण होऊन बसतं.

  • Share this:

हमीरपूर, 15 मे: कौटुंबिक जिव्हाळा, नात्यांमधील प्रेम या गोष्टी प्रत्येक माणसाला अत्यंत हळव्या करतात. सध्याच्या कोरोना काळात (Corona) तर अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत. या काळात प्रत्येकजण आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी, कुणी आजारी पडलं तर त्याच्या उपचारांसाठी धडपडताना दिसत आहे. कोणत्याही कारणानं कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू (Death) झाला तर त्याचं दुःख आभाळाएवढं असतं. हा धक्का कधीकधी इतका तीव्र असतो की नातलगांना हे दु:ख सहन करणं कठीण होऊन बसतं. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हमीरपूर भागात अशीच काहीशी घटना घडली आहे. आपल्या भावाच्या (Brothers) मृत्यूची घटना ही व्यक्ती सहन करु शकली नाही आणि त्यातच त्यांचाही मृत्यू झाला. आप्तस्वकीयांना या दोन्ही भावांवर एकत्रितच अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील एका कुटुंबातील लहान भावाचा तापामुळे (Fever) दुर्दैवी मृत्यू झाला. हे दुःख मोठ्या भावाला सहन न झाल्याने त्याचाही त्याचवेळी मृत्यू झाला. एकाच घरातील दोन्ही भावांवर एकाचवेळी गावाबाहेर अंत्यसंस्कार करण्याची ग्रामस्थांवर वेळ आल्यानं संपूर्ण गावात शोककळा पसरली.

हे वाचा-ब्लड कॅन्सर पीडित 3 वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण; 7 दिवसांनी घडलं अनपेक्षित

हमीरपूर जिल्ह्यातील मुस्करा भागातील खडेहीलोधन गावातील निवृत्त शिक्षक रामगोपाल वर्मा गेल्या 4 दिवसांपासून ताप आणि खोकल्यामुळे आजारी होते. कुटुंबियांनी त्यांना रठ शहरातील रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी त्यांना झाशीतील एका खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखलही करण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रामगोपाल वर्मा यांचे पार्थिव दोन दिवसांपूर्वी गावात आणण्यात आले. मात्र आपल्या लहान भावाचे पार्थिव बघून मोठ्या भावाला जबर धक्का बसला आणि त्यांचाही मृत्यू झाला.

हे वाचा-सलाम! खालावली मित्राच्या आईची ऑक्सिजन पातळी, 420 KM प्रवास करुन आणलं रेमडेसिवीर

या दोन्ही भावांचे लहानपणापासून एकमेकांवर खूप प्रेम होते. ते दोघेही आपपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत होते. ते दररोज जेवण मात्र एकत्र बसून करीत असत. रामगोपाल वर्मा गेल्या काही दिवसांपासून तापाने आजारी होते. तसेच त्यांचा मोठा भाऊ देखील काही दिवसांपासून आजारी होता. परंतु, ते लहान भावाच्या मृत्यूची घटना सहन करु शकले नाहीत,अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. या दुःखद घटनेनंतर दोन्ही भावांवर गावाबाहेर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थ आणि कुटुंबीयांमध्ये शोकाकूल वातावरण होतं.

First published: May 15, 2021, 3:45 PM IST

ताज्या बातम्या