News18 Lokmat

या गाड्यांवर मिळणार 50 हजारांची सूट, सरकारची ही आहे खास योजना!

प्रदूषण करणाऱ्या गाड्यांवरचा कर वाढविण्याची आणि प्रदूषण न करणाऱ्या गाड्यांवर सूट देण्याची सरकारची योजना आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 19, 2018 07:36 PM IST

या गाड्यांवर मिळणार 50 हजारांची सूट, सरकारची ही आहे खास योजना!

नवी दिल्ली,19 डिसेंबर : प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने मोठी योजना आखली आहे. प्रदूषण करणाऱ्या गाड्यांवरचा कर वाढविण्याची आणि प्रदूषण न करणाऱ्या गाड्यांवर सूट देण्याची सरकारची योजना आहे. नीती आयोग या योजनांवर काम करत असून सरकार लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे.


सरकारच्या या योजनेनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या कार आणि इतर गाड्यांवर सरकार 12 हजारांपर्यंत कर लावणार आहे. 'पलूटर पे' म्हणजे प्रदूषण कर लावण्याची ही योजना आहे. या करातून जे पैसे येतील त्यातून इलेक्ट्रिक गाड्यांवर सूट देणार आहे.


टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार इलेक्ट्रिक टु व्हिलर, थ्री व्हिलर आणि कार वर ही सुट मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक गाड्यांचे पार्ट्स आणि बॅटरीवर सध्या 18 ते 28 असा जीएसटी आहे. तो जीएसटी कमी करून 12 टक्क्यांवर आणण्यात येणार आहे.

Loading...


त्यामुळं गाड्यांच्या किंमती कमी होणार आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रिक गाड्यांच्या रजिस्ट्रेशन शुल्कात कपात, रोड टॅक्समध्ये सूट, इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग सेंटर्स अशा अनेक सुविधा देण्याची सरकारची योजना आहे.


पेट्रोलही होणार स्वस्त


पेट्रोल डिझेलने लोकांचं कंबरडं मोडलेलं असताना आता एक खुशखबर आहे. पेट्रोलमध्ये मिथेनॉल मिसळण्याची सरकारची योजना असून त्यामुळं पेट्रोलचे भाव तब्बल 10 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. नीती आयोगाच्या देखरेखीखाली पुण्यात त्याच्या चाचण्याही सुरू आहेत. त्यात यश आलं तर पेट्रोल तब्बल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे.


सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं जातं पण त्याचं प्रमाण कमी आहे. उसाच्या चिपाडापसून इथेनॉल बनवलं जातं. त्याचा भाव एका लिटरला 42 रुपये आहे. तर मिथेनॉल हे कोळशापासून तयार केलं जातं ते एका लिटरला 20 रुपये एवढ्या स्वस्त दरात ते उपलब्ध होऊ शकतं. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 19, 2018 07:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...