मराठी बातम्या /बातम्या /देश /

आता खातेवाटपाला ब्रेक, महाराष्ट्रात पावसाचं धुमशान, दिल्लीत ओमिक्रॉनचा नवीन सब-व्हेरियंट TOP बातम्या

आता खातेवाटपाला ब्रेक, महाराष्ट्रात पावसाचं धुमशान, दिल्लीत ओमिक्रॉनचा नवीन सब-व्हेरियंट TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  • Published by:  Rahul Punde
मुंबई, 11 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजूनपर्यंत शपथ घेतलेल्या मंत्र्यांचं खातेवाटप झालेलं नाही. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या घोषणेवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी टीका केली आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड (Sindhudurg Devgad) तालुक्यातील सुपुत्र भारताचे 49 वे सरन्यायाधीश (Chief Justice) होणार आहेत. राज्यात पावसाने धुमशान घातलं असून पुण्याला येलो अलर्ट देण्यात आले आहे. शपथ झाली पण खातेवाटपाला ब्रेक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतल्यानंतर 39 दिवसांनी मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारानंतर अजूनपर्यंत शपथ घेतलेल्या मंत्र्यांचं खातेवाटप झालेलं नाही. या खातेवाटपाला आता उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शेतकऱ्यांना NDRF पेक्षा दुप्पट मदतीचा निर्णय फसवा : अजित पवार एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या घोषणेवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी टीका केली आहे. एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मत करण्याचा निर्णय फसवा आणि धुळफेक करणारा आहे, असा आरोप अजित पवारांनी केला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शिंदे-ठाकरे वादाला नवी तारीख शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदेंची? महाराष्ट्रात स्थापन झालेलं सरकार कायदेशीर का बेकायदेशीर? 16 आमदारांच्यावर अपात्रतेच्या टांगत्या तलवारीचं काय? सत्तास्थापनेत राज्यपालांची भूमिका योग्य का अयोग्य? निवडणूक आयोगासमोर सुरू असलेला शिवसेनेचा वाद, या सगळ्या मुद्द्यांवर होणारी सुनावणी 10 दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. संजय राठोड आक्रमक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते, महाराष्ट्र सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री संजय राठोड यांनी अखेर त्यांच्यावरील गंभीर आरोपांवर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मराठमोळे न्यायमूर्ती उदय लळीत होणार 49 वे सरन्यायाधीश कोकणवासीयांच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड (Sindhudurg Devgad) तालुक्यातील सुपुत्र भारताचे 49 वे सरन्यायाधीश (Chief Justice) होणार आहेत. 27 ऑगस्टला न्यायमूर्ती उदय उमेश लळीत (Uday Umesh Lalit) हे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रात पावसाचं धुमशान! राज्यातील विविध भागात पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. अनेक नद्यांना पूर आले असल्यामुळे पूरपरिस्थितीही निर्माण झाली आहे. यातच आता हवामान खात्याने राज्यातील पावसासंदर्भात एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. दिल्लीत ओमिक्रॉनचा नवीन सब-व्हेरियंट दिल्लीत कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत असून यामागे नवीन व्हेरियंट असल्याचे अहवालात समोर आले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
First published:

Tags: Eknath Shinde, Uddhav thacakrey

पुढील बातम्या