प्रयागराज, 17 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशच्या भाजप खासदार डॉ. रीता बहुगुणा जोशी (BJP MP Dr Rita Bahuguna Joshi) यांच्या 6 वर्षांच्या नातीचा फटाके फोडताना जळून मृत्यू झाला. 6 वर्षांची नात किया जोशी रात्री फटाके फोडताना गंभीर जखमी झाली. डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णालयात कियाला दाखल केले तेव्हा ती 60 टक्के भाजली होती. प्रयागराजच्या खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच किया जोशीचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी कियाला एअर अॅम्ब्युलन्सद्वारे दिल्लीला हलविण्यात येणार होते, मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला. कियाच्या अकस्मित निधनामुळे खासदार डॉ. रीता बहुगुणा जोशी आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
वाचा-6 वर्षांच्या चिमुरडीवर केला सामूहिक बलात्कार, नरबळीसाठी नराधमांनी काढली फुफ्फुसं
Prayagraj: Eight-year-old granddaughter of BJP MP Rita Bahuguna Joshi died after getting burnt due to firecrackers.
— ANI UP (@ANINewsUP) November 17, 2020
वाचा-शहीद वडिलांना 10 वर्षांच्या लेकीनं केला अखेरचा सलाम, दिला 'वंदे मातरम्'चा नारा
खासदार रीता जोशी यांनी अपघातानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि सीएम योगी यांच्याशी बोलून उपचारांसाठी मदत मागितली होती. त्यानंतर रीता जोशी यांच्या नातीवर दिल्लीतील सैनिकी रुग्णालयात उपचार होणार होते.
वाचा-चीनचं निघालं दिवाळं! भारतीयांच्या एका निर्णयामुळे बसला 40 हजार कोटींचा फटका
मिळालेल्या माहितीनुसार, मुलांसोबत फटाके फोडत असताना एक फटाका फुटला आणि किया गंभीर जखमी झाली. 6 वर्षीय कियानं काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात दिली होती. तिच्यावर गुडगावच्या रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. अलाहाबाद लोकसभा मतदार संघातील भाजप खासदार रीता जोशी योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diwali