नवी दिल्ली, 12 जानेवारी : राफेलच्या मुद्द्यावरून सध्या भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आहेत. संसदेतही या मुद्द्यावर सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वाद झाले आहेत. या सगळ्यात आता 8 वर्षाच्या एका लहान मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये ही चिमुरडी राहुल गांधी यांना राफेल विमान प्रकरण समजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
देशाच्या सरंक्षण मंत्री निर्मला सितारमण यांनी हा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ आणखीनच चर्चेत आला. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी मुलीला धन्यवाद म्हटलं आहे.
या व्हिडिओमध्ये ही मुलगी NDA सरकारच्या राफेल दराचं अंतर हे भूमितीच्या माध्यमातून शिकवत आहे.
Thanks for posting this. My special thanks to this smart young lady (dear child, if affection permitted) for taking interest in the matter of fighter aircraft #Rafale. My good wishes for her to fly one of them as a trained fighter pilot of the @IAF_MCC @DefenceMinIndia https://t.co/fsteyBIw1U
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) January 10, 2019
या मुलगी म्हणते की, 'मी राफेल प्रकरणाला सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करत आहे. हे राहुल गांधी यांचं राफेल विमान आहे. जे आतून रिकामं आहे आणि त्याची किंमत 720 कोटी रुपये आहे. दुसरं राफेल विमान मोदींचं आहे. जे आतून अत्याधुनिक हत्यारांनी भरलेलं आहे. त्याची किंमत 1600 कोटी रुपये आहे.'
'राहुल गांधी यांना एक गोष्ट समजत नाही आहे की, ते जी किंमत सांगत आहेत ते एका साध्या विमानाची आहे आणि हत्यांरांनी भरलेल्या विमानाची किंमत ही खरी किंमत आहे. '
VIDEO : कधीच नसेल पाहिलेला अपघात, बसखाली आल्यानंतरही बचावले 3 तरूण!