बलात्कारानंतर 8 वीतल्या विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न, चिठ्ठीमध्ये आईकडे मागितलं हे वचन

बलात्कारानंतर 8 वीतल्या विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न, चिठ्ठीमध्ये आईकडे मागितलं हे वचन

सामूहिक बलात्कारानंतर ती आठवीतील मुलगी मानसिकदृष्ट्या खचली होती

  • Share this:

बैतूल, 26 फेब्रुवारी : मध्य प्रदेशातील बैतूलमधील एक धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणी आला आहे. याच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील एका 8 वीच्या विद्यार्थिनीचा सामूहिक बलात्कारा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर तिला असह्य झालं व तिने अंगावर केरोसिन टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पीडिता तब्बल 95 टक्के जळाली आहे आणि तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या 8 वीच्या विद्यार्थिनीवर 3 जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात खळवळ उडाली आहे. बलात्कारामुळे खचलेल्या या 8 वीतील मुलीने मंगळवारी केरोसिन टाकून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा -लग्नाच्या आनंदात पसरली शोककळा, भीषण अपघातामध्ये 18 वऱ्हाड्यांचा मृत्यू

17 दिवसांत लागणार होती हळद, असं काय झालं की MD डॉक्टर तरुणीने घेतला गळफास?

पोलिसांनी या घटनेत बलात्कार झाल्याच्या आरोप अमान्य केला आहे.  मीडियाच्या अहवालानुसार, मुलीच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की, विद्यार्थिनी एका कामासाठी मंगळवारी बैतूल येथे गेली होती. यादरम्यान तीन मुलांनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर मानसिक तणावाखाली आलेल्या विद्यार्थिनीने एक सुसाइट नोट लिहिली. ज्यामध्ये तिने नाव व मोबाइल क्रमांक लिहिला आहे. या सुसाइड नोटमध्ये तिने कुटुंबीयांकडे, त्या नराधमांना सोडू नका अशी मागणी केली आहे. पीडितेच्या आईने तीन आरोपींची नावं सांगितली आहेत. पीडितेची प्रकृती अत्यंत नाजूक असून रात्री उशिरापर्यंत तिचा जबाब घेता आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2020 02:50 PM IST

ताज्या बातम्या