सियाचीनमध्ये हिमकडा कोसळल्याने 4 जवानांसह 6 जणांचा मृत्यू

सियाचीनमध्ये हिमकडा कोसळल्याने 4 जवानांसह 6 जणांचा मृत्यू

जगातली सर्वातं उंचावरची युद्धभूमी असलेला सियाचिनचं युद्धक्षेत्र हे लष्करासाठी कायम आव्हानात्मक राहिलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 18 नोव्हेंबर : जगातली सर्वात उंचावरची युद्धभूमी असलेल्या सीयाचीनवर लष्कराच्या जवानांवर पुन्हा एकदा संकट कोसळलंय. हिमवादळात कडा कोसळल्यामुळे 4 जवान शहीद झाले आहे. तर इतर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. हे जवान त्यावेळी गस्त घालत होते. 18 हजार फुटावर ही घटना घडली. लष्कर आणि हावईदलाने बचाव कार्य सुरू आहे.

सियाचीनवर दुपारी 3:30च्या सुमारास ही घटना घडली. तब्बल 18,000 फुटांच्या उंचीवर ही दुर्घटना घडली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सैन्याचे जवान शहीद झाले तरे पेट्रोलिंग करण्यासाठी गेले होते. या दलामध्ये एकूण 8 जवान होते. तेव्हा ही दुर्घटना घडली'. हाडं गोठवणारी थंडी, शुन्याच्या खाली कितीतरी जास्त तापमान आणि अतिशय प्रतिकूल असणारा निसर्ग अशा वातावरणात लष्करी जवानांना तिथे काम करावं लागतं.

अशा वातावरणात ऑक्सिजनचीही कमतरता असते. त्यामुळे शारिरीक आणि मानसिक कसोटी पाहणारं हे काम अत्यंत जोखमीचं असतं. या आधीही सियाचीनवर अशा घटना घडल्या आहेत. जगातली सर्वातं उंचावरची युद्धभूमी असलेला सियाचिनचं युद्धक्षेत्र हे कायम आव्हानात्मक असतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2019 09:43 PM IST

ताज्या बातम्या