मराठी बातम्या /बातम्या /देश /

भारतात सुरू होणार 8 नवीन उड्डाण प्रशिक्षण अकादमी; महाराष्ट्रातील 'या' शहराचा समावेश

भारतात सुरू होणार 8 नवीन उड्डाण प्रशिक्षण अकादमी; महाराष्ट्रातील 'या' शहराचा समावेश

Flying training academies in India: संपूर्ण देशभरात आठ नवीन उड्डाण प्रशिक्षण अकादमी सुरू होणार आहेत.

Flying training academies in India: संपूर्ण देशभरात आठ नवीन उड्डाण प्रशिक्षण अकादमी सुरू होणार आहेत.

Flying training academies in India: संपूर्ण देशभरात आठ नवीन उड्डाण प्रशिक्षण अकादमी सुरू होणार आहेत.

  • Published by:  Sunil Desale
नवी दिल्ली, 2 जून: भारतात आता आठ नवीन हवाई उड्डाण प्रशिक्षण अकादमी (8 new flying training academies) सुरू होणार आहेत. या अकादमी ज्या ठिकाणी सुरू होणार आहे त्यापैकी एक शहर हे महाराष्ट्रातील (Maharashtra) आहे. महाराष्ट्रातील जळगाव शहरात (Jalgaon City) ही अकादमी सुरू होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मुक्त हवाई उड्डाण प्रशिक्षण संघटनेच्या धोरणांतर्गत या अकादमी सुरू होणार आहेत. या आठ अकादमी ज्या ठिकाणी सुरू होणार आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील जळगाव (Jalgaon)सह बेळगाव (Belgavi), कलबुर्गी (Kalaburagi), खजुराहो (Khajuraho) आणि लिलाबारी (Lalbari) या ठिकाणांचा समावेश आहे. या जागांवर प्रशिक्षण अकादमी सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. PETA वर बंदी घाला, अमूलचं पंतप्रधानांना पत्र, षडयंत्राचाही आरोप भारतातील शेजारील देशांतील विद्यार्थ्यांच्या हवाई उड्डाण प्रशिक्षणविषयक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने या अकादमींची रचना करण्यात येणार आहे. नागरि उड्डान मंत्रालयाने सांगितले की, भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या लिबरल फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ) धोरणांतर्गत भारताला नवीन उड्डाण प्रशिक्षण अकादमी मिळणार आहेत. या उपक्रमामुळे भारतीय उड्डाण प्रशिक्षण क्षेत्राला एक चांगली संधी मिळेल आणि आत्मनिर्भर भारत पुढाकार आणि अधिक स्वावलंबी होण्यास मदत होईल. हवामान विषयक समस्या उद्भवण्याचे आणि नागरी तसेच लष्करी हवाई वाहतुकीचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे अकादमीसाठी या शहरांची निवड करण्यात आली आहे. या हवाई उड्डाण प्रशिक्षण अकादमीला आकर्षक बनवण्यासाठीभारतीय विमानतळ प्राधिकरणाने केंद्रांच्या वार्षिक भाडेशुल्कात कपात करून 15 लाख रुपये केले आहे.
First published:

Tags: Airplane, Jalgaon

पुढील बातम्या