आठ महिन्यांच्या गर्भवतीची चाकूनं भोसकून हत्या; मुलाची प्रकृती गंभीर

लंडनमध्ये महिलेची चाकून भोसकून हत्या करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2019 04:09 PM IST

आठ महिन्यांच्या गर्भवतीची चाकूनं भोसकून हत्या; मुलाची प्रकृती गंभीर

लंडन, 01 जुलै : इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे. 8 महिन्यांच्या गर्भवतीची चाकूनं भोकसून हत्या करण्यात आली आहे. ब्रिटीश सरकारनं या घटनेची गंभीर दखल घेत घटनेचं वर्णन भयावहक असं केलं आहे. या घटनेनंतर डॉक्टरांनी मुलाला वाचवलं असून त्याची प्रकृती मात्र नाजूक आहे. पॅरामेडिकलद्वारे डॉक्टरांनी मुलाला वाचवण्यात यश मिळवलं आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये पोलिसांनी 29 वर्षीय आरोपीला अटक देखील केली आहे.

दक्षिण लंडनमध्ये क्रॉयडन येथे राहणाऱ्या 26 वर्षीय मॅरी फॉव्रेलेची चाकून भोसकून हत्या केली आहे.  पण, उपचारादरम्यान कार्डिअक अरेस्टनं महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. महिलेवर झालेल्या हल्ल्यानंतर तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न केला. पण, आठ महिन्यांची गरोदर असल्यांनं तिचा कार्डिअक अरेस्टनं मृत्यू झाला. डिलिव्हरी होण्यापूर्वी महिलेचा मृत्यू झाला होता. म्हणून मग पॅरामेडिकलद्वारे महिलेची डिलिव्हरी केली गेली. पण, काही कारणास्तव महिलेचं शवविच्छेदन देखील करण्याचं डॉक्टरांनी टाळलं आहे.

सरसंघचालक मोहन भागवत Twitterवर; नरेंद्र मोदी नाही तर यांना करतात Follow !

काय म्हणाले पोलीस?

प्रकरणाचा तपास करणाऱ्या माईक नॉरमन यांनी सांगितले की हे ‘कृत्य अत्यंत भयावह असं आहे. यामुळे एका तरूणीचा मृत्यू झाला आहे तर, एक बाळ जीवनाशी लढा देत आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. शिवाय, पुरावे देखील गोळा केले जात आहेत.’ या प्रकरणात लंडनच्या महापौरांनी देखील ट्विट करत अशा प्रकारचे महिलांप्रति होणारे गुन्हे सहन केले जाणार नाहीत असं म्हटलं आहे. दरम्यान, मागील दिवसांपासून लंडनमधील गुन्हेगारीमध्ये देखील वाढ झाली आहे.

Loading...

3 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे सुर्या नदीला पूर, 26 गावांना मोठा धोका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2019 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...