News18 Lokmat

भाजपला सोबत न घेता नितीश कुमारांनी केला मंत्रिमंडळाचा विस्तार!

बिहारमध्ये मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. पण नितीश कुमार यांनी भाजपला सोबत न घेता हा विस्तार केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 2, 2019 06:18 PM IST

भाजपला सोबत न घेता नितीश कुमारांनी केला मंत्रिमंडळाचा विस्तार!

पाटणा, 02 जून: बिहारमधील एनडीए सरकारचा रविवारी विस्तार झाला. राष्ट्रीय जनता दलाशी नातं तोडून भाजप सोबत सरकार स्थापन करणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळात आठ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. हे सर्व मंत्री जनता दल (संयुक्त)चे आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजप अथवा लोक जनशक्ती पार्टीच्या कोणत्याही आमदाराचा समावेश केला गेला नाही. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या स्थापनेत जेडीयूला योग्य प्रतिनिधित्व न दिल्याने कुमार यांनी मोदी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. पण असे असले तरी त्यांनी मोदी सरकारला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मंत्रिमंडळात जेडीयूच्या कोट्यातील जागा रिक्त होत्या. त्यामुळे केवळ जेडीयूच्या आमदारांना स्थान देण्यात आले आहे. विस्तारासंदर्भात भाजपशी कोणताही वाद नाही. सर्व काही ठीक आहे असे मुख्यमंत्री कुमार यांनी सांगितले. कुमार यांनी मंत्रिमंडळात श्याम रजक, नरेन्द्र नारायण यादव, बीमा भारती, रामसेवक सिंह, लक्षमेश्वर राय, संजय झा, नीरज कुमार आणि रामसेवक सिंह यांचा समावेश. विशेष म्हणजे ज्या लोकांना मंत्रिमंडळात घेतले आहे. त्यापैकी एकही आमदार फार परिचित नाही.

भाजप सरकारमध्ये सहभागी होणार नाही?

मोदी सरकारमध्ये JDUला केवळ एकच मंत्रिपद देण्यात आले होते. पण ही ऑफर JDUने अमान्य केली. बिहारमध्ये निवडणुकीच्या आधी भाजपशी कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही. तसेच आमचा पक्ष मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही.

कुमार यांचा पलटवार

Loading...

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजय झालेल्या राज्य मंत्रिमंडळातील तिघा मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. तेव्हाच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे निश्चित मानले जात होते. केंद्र सरकारचा शपथविधी झाल्यानंतर तीनच दिवसात कुमार यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला. कुमार यांचा हा निर्णय मोदींना दिलेला पलटवार असल्याचे मानले जात आहे.


VIDEO : बिल टाळण्यासाठी बिर्याणीत अळ्या टाकल्या, 'एसपीज्'च्या मालकाच्या उलट्या बोंबा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 2, 2019 06:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...