26 जून : आज रमजान ईद. देशभरात आज रमजान ईदचा सण उत्साहात साजरा करण्यात येतोय. सकाळपासून नवाज अदा करण्यासाठी मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी गर्दी केलीय. युसूफ आणि इरफान पठान यांनी नमाज अदा करून सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बाजारपेठाही ईदसाठी सजल्या आहे. कापड दुकांनासह सुकामेव्यांची दुकानं गर्दीने फुलली आहेत. रमजाननिमित्त शेवयांना सर्वाधिक मागणी असून, त्याखालोखाल काजू, बदाम, मणुके, असा सुकामेवा खरेदी केला जात होता. आज ईदच्या निमित्ताने घरोघरी शिरखुर्मा तयार करण्यात येणार.
अनेक ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.दरम्यान वल्लभगडजवळील खंदावली गावात आज ईदवर दु:खाचे सावट आहे. या गावच्या जुनैद नावाच्या इसमाची ट्रेनमध्ये मारहाण करून हत्या करण्यात आल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. परिणामी ईदची नमाज काळ्या पट्ट्या बांधून अदा करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. घरांमध्ये गोडधोडही बनवलं जाणार नाही. लखनौमध्येही लोक काळी पट्टी लावून ईद साजरी करणार आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा