#EidMubarak2018: रमजानच्या महिनाभराच्या उपवासानंतर जगभरात साजरी केली जातेय ईद

#EidMubarak2018: रमजानच्या महिनाभराच्या उपवासानंतर जगभरात साजरी केली जातेय ईद

भारतात आज ईद हा पवित्र सण साजरा केला जातोय.

  • Share this:

मुंबई, 16 जून : भारतात आज ईद हा पवित्र सण साजरा केला जातोय. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजून 35 मिनिटाला चंद्र दर्शन झाल्यानं आज ईद साजरी होतेय. जामा मशिदचे शाही इमाम बुखारी यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात.

ईदच्या चंद्रदर्शनानंतर मुंबईत दुकानांमध्ये खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. आज सगळे मुस्लिम बांधव नवे कपडे घालून नमाज अदा करायला मशिदीत जातात. त्याचबरोबर मुस्लिम महिलाही नमाज अदा करतात.

इस्लामिक लोकांसाठी हा सर्वात मोठा उत्सव आहे. इस्लामच्या इतिहासात ईद उल-फित्रचा उत्सव 624 मध्ये प्रेषित मोहम्मद यांनी साजरा केला. असे म्हटले जाते की त्या वेळी  'जंग-ए-बदर'च्या लढाईत पैगंबरांनी विजय मिळवला होता.

ईदचा उत्सव साजरं करण्यामागे आणखी एक कारण म्हणजे संपूर्ण महिनाभर रोजा ठेवणे, तसेच काम पूर्ण करण्याच्या आनंदाही असतो. ईद आणि रोजा ठेवण्यातून ईश्वराला आभार मानण्यात येतात.

 

First published: June 16, 2018, 9:05 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading