VIDEO : ‘कोरोना’मुळं हजारो अंडी दिली फेकून, 8 दिवसानंतर घडला चमत्कार!

VIDEO : ‘कोरोना’मुळं हजारो अंडी दिली फेकून, 8 दिवसानंतर घडला चमत्कार!

अंडी फेकल्यानंतर निसर्गाने केलेला चमत्कार बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

  • Share this:

मुंबई 05 एप्रिल : कोरोनाविषयी प्रचंड दहशत पसरली आहे. सोशल मीडियामुळे माहितीचा प्रचंड मारा होतोय. यात फेक न्यूज आणि चुकिच्या सल्ल्यांचा मोठा समावेश आहे. काही लोक विशिष्ट हेतूने खोटी माहिती पसरवीत असतात. त्याचा समाजावर मोठा परिणाम होतो. मांसाहार केल्याने कोरोना पसरतो अशी अफवा पसरल्याने लोकांनी मांसाहार करणं बंद केलं. त्याचा फटका व्यावसायिकांना बसला. चिकनमुळे कोरोना पसरतो ही फेक न्यूज मोठ्या प्रमाणात पसरली. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायावर कुऱ्हाडच कोसळली.  लोक अंडी रस्त्यावर फेकून देऊ लागले. असा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून अंडी फेकल्यानंतर निसर्गाने केलेला चमत्कार बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

पाँडिचेरीच्या नायब राज्यपाल किरन बेदी यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होतो ही अफवा पसरली आणि लोकांनी चिकन आणि अंडी खाणं सोडून दिलं. त्यामुळे पोल्ट्रीवाल्यांनी आपल्याकडी हजारो अंडी रस्त्याच्या कडेला फेकून दिली. आठ दिवसानंतर त्या ठिकाणी चमत्कार घडल्यासारखं दृष्य दिसलं.

आठ दिवसानंतर त्या अंड्यांमधून हजारो पिल्लं बाहेर पडली. ज्या ठिकाणी ही अंडी फेकून देण्यात आली होती त्या ठिकाणी रस्त्यावर कोंबडीची हजारो पिल्लं दिसू लागली. सगळं गाव हे दृष्य पाहण्यासाठी जमा झालं. आता अनेक लोक ती पिल्लं आपल्या घरी नेत आहेत. मात्र बहुसंख्य पिल्लांचं काय होणार? या चिंतेने प्राणी प्रेमींच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

कोरोनाचं थैमान : देशात 24 तासात 472 नवे रूग्ण, 274 जिल्ह्यांना ग्रासलं

देशातले कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. गेल्या 24 तासात 472 नवीन रूग्ण आढळून आलेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषद देण्यात आलीय. मंत्रालयातले सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. त्यामुळे रूग्णांची एकूण संख्या 3774 झाली आहे. आत्तापर्यंत 79 मृत्यू झाले असून गेल्या 24 तासांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. तर 267 जण आजारातून बरे झालेत. तर देशातल्या 274 जिल्ह्यांमध्ये कोरोना पसल्याची माहितीही त्यांनी दिली.

कोरोनाचा व्हायरस हवेतून पसरतो? ICMRने केला मोठा खुलासा

लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंग हे सर्वात मोठं सामाजिक औषध आहे. सरकार आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचं पालन जेव्हढ्या काटेकोरपणे केलं जाईल तेवढ्या प्रमाणात कोरोनाला रोखण्यात यश मिळेलं असंही अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

भारतात 30 जानेवारी रोजी पहिला कोरोना रुग्ण केरळमध्ये आढळून आला. त्यानंतर आता तब्बल कोरोनाची संख्या तिपटीने वाढली आहे. सुरुवातीला केवळ विदेशातून परतलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र आता हळुहळु क्लस्टर आउटब्रेक आणि संपर्कातून संक्रमण होण्यास सुरुवात झाली आहे. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेने रुग्णांचा आकडा कमी दिसत असला तरी, त्यात होणारी वाढ ही भारतासाठी धोक्याची आहे. भारत अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहे.

First published: April 5, 2020, 6:51 PM IST

ताज्या बातम्या