नवी दिल्ली 02 ऑक्टोबर: कोरोनाच्या संकटाचा सगळ्याच व्यवसायावर परिणाम झाला आहे. अनेकांचं कंबरडच मोडल्याने व्यवसायला मोठा धक्का बसला आहे. यात पोल्ट्री व्यवसायाचाही समावेश आहे. केवळ गैरसमजामुळे या व्यवसायावर संकट कोसळल्याने आता अंडी महागण्याची (Egg Price) शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दररोज अंडी खाणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात कोरोनाची साथ आल्यानंतर कोंबड्यांच्या माध्यमातून हा रोग पसरतो अशी अफवा पसरली होती. त्यामुळे लोकांनी चिकन आणि अंडी खाणं बंद केलं होतं. त्याचा परिणाम म्हणून पोल्ट्री व्यावसायिकांना कोंबड्या सोडून द्याव्या लागल्या किंवा जमीनित गाड्याव्या टाकल्या त्यामुळे पोल्ट्री फार्ममध्ये सध्या कोबंड्यांचं प्रमाण हे 45 ते 50 टक्के कमी असल्याचं मत या क्षेत्रातल्या व्यावसायिकांनी व्यक्त केलं आहे.
कोंबड्याच नसल्यामुळे अंडी नाहीत आणि आता हिवाळा लागणार असल्याने अंड्यांची मागणी वाढत जाणार आहे. त्यामुळे भावही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात सगळेचव्यवहार बंद असल्याने लोक खरेदी करत नव्हते. लोकांच्या खाण्याचाच प्रश्न निर्माण झाल्याने कोबंड्यांना दाना-पानी तरी कुठून मिळणार असा सवालही या व्यावसायिकांनी केला आहे.
अफवा आणि सरकारचं उत्तर
चीनच्या (China) वुहानमधून (Wuhan) जगभरात हातपाय पसरणाऱ्या कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) धसका संपूर्ण जगानं घेतला. भारतातल्या लोकांनी तर अगदी चिकन (Chicken), अंडी (Eggs) खाणंही सोडून दिलं. चिकन खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो, असं बरेच मेसेज सोशल मीडियावरही फिरत होतो. त्यामुळे तुमच्या ताटात चिकन किंवा अंडं आलं तर त्यावर ताव मारण्याआधी आपल्याला कोरोनाव्हायरस तर होणार नाही, असा प्रश्न येणं साहजिकच आहे.
'में किसी से नहीं डरूंगा' राहुल गांधींचा आक्रोश; UP पोलिसांकडून 48 पानी FIR दाखल
मात्र खरंच चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो का? तर याचं उत्तर आहे नाही. खुद्द केंद्र सरकारने याची पुष्टी दिली आहे. चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होत नाही, असं केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. पशुपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितलं की, "चिकन खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो, ही अफवा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.
कोरोनावर लस येईल मात्र ती जगभर पोहोचणार कशी? सगळेच देश लागले कामाला
कोरोनाव्हायरस हा एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला होतो आहे. चिकन खाल्ल्याने कोणत्याही व्यक्तीला कोरोनाव्हायरस झालेला नाही. जगभरातील कोरोनाव्हायरसचा पोल्ट्री उत्पादनांशी काहीच संबंध मिळालेला नाही. त्यामुळे चिकन पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी बिनधास्तपणे खावं"