ऑस्ट्रेलियन खासदाराच्या डोक्यात अंडे फोडणाऱ्या मुलावर पैशांचा पाऊस

ऑस्ट्रेलियन खासदाराच्या डोक्यात अंडे फोडणाऱ्या मुलावर पैशांचा पाऊस

न्यूझीलंडमध्ये मशिदीत झालेल्या गोळीबारानंतर ऑस्ट्रेलियातील खासदाराने वादग्रस्त वक्तव्य केले होते.

  • Share this:

वेलिंग्टन, 18 मार्च : न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्चमध्ये झालेल्या गोळीबारानंतर वादग्रस्त विधान करणाऱ्या ऑस्ट्रेलियन खासदारावर एका तरुणाने अंडे फोडले होते. ऑस्ट्रेलियातील खासदार फ्रेजर एनिंग यांनी न्यूझीलंड गोळीबाराला मुस्लीम प्रवासी दोषी असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर एनिंग प्रसारमाध्यमांशी बोलत असताना तरुणाने त्यांच्या डोक्यावर अंडे फोडले होते.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जगभरात तरुणाचे कौतुक केले जात आहे. खासदाराच्या डोक्यात अंडे फोडणाऱ्या तरुण फेसबुक आणि ट्विटरवर प्रसिद्ध झाला आहे. त्याला इतकी प्रसिद्धी मिळाली की त्याच्यावर पैशांचा पाऊस पडत आहे.खासदाराच्या डोक्यावर अंडे फोडल्यानंतर त्याच्यावर टीका करण्याऐवजी चक्क लोक तरुणाला पैसे पाठवत आहेत. युजर्स म्हणत आहेत की, या अँटी फॅसिस्ट हिरोने आणखी अंडी खरेदी करावीत. द्वेष आणि तिरस्कार पसरवणारी वक्तव्य करणाऱ्या लोकांवर अंडी फेकून मारण्यासाठी लोक त्याला पैसे पाठवत आहेत. त्याच्याकडे आतापर्यंत 43 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 27 लाख रुपये जमा झाले आहेत.शनिवारी ऑस्ट्रेलियातील खासदार फ्रेजर एनिंग यांन न्यूझीलंडमधील मशिदीत झालेल्या गोळीबाराला मुस्लीमांचे होत असलेलं स्थलांतर जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर तरुणाने एनिंग यांच्या डोक्यात अंडे फोडले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर #Eggboy ट्रेंड सुरू झाला आहे. यावर अंडे फोडणाऱ्या तरुणाचे कौतुक केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 18, 2019 04:03 PM IST

ताज्या बातम्या