Budget2018 : वर्षभरात 70 लाख नोकऱ्यांची निर्मिती झाल्याचा जेटलींचा दावा

Budget2018 : वर्षभरात 70 लाख नोकऱ्यांची निर्मिती झाल्याचा जेटलींचा दावा

देशातल्या शिक्षण क्षेत्रासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १ लाख कोटींची तरतूद करण्यात आलीय.

  • Share this:

01 फेब्रुवारी : या वर्षाच्या अर्थसंकल्पात तरूणांच्या अपेक्षांना किती जागा देण्यात आलीय. रोजगार निर्मिती आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी काय तरतुदी करण्यात आल्या आहेत, त्यावरही एक नजर टाकुयात

तरूण वर्गाच्या मतदानाच्या जोरावार, भाजपनं गेल्या 5 वर्षात राजकीय विजयाची परंपरा कायम राखलीय. त्यामुळं 2019च्या लोकसभा निवडणुकीआधीचा अर्थसंकल्प सादर करताना, तरूण वर्गांच्या अपेक्षांना स्थान देणं गरजेचं होतं.  आणि या परीक्षेत अरूण जेटली किती यशस्वी झालेत ते पहा

तरुणांना काय मिळालं?

वर्षभरात ७० लाख नवीन नोकऱ्यांची निर्मिती झाल्याचा दावा अरुण जेटलींनी केलाय. तर मुद्रा योजनेंतर्गत होतकरू तरूणांना कर्ज देण्यासाठी ३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय.

शिक्षण क्षेत्रासाठी अरूण जेटलींनी कोणत्या घोषणा केल्यात त्याचाही आढावा घेऊयात..

देशातल्या शिक्षण क्षेत्रासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १ लाख कोटींची तरतूद करण्यात आलीय.

शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी १३ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिलंय

यंदाच्या अर्थसंकल्पात अनुसुचित जाती आणि आदिवासींच्या शिक्षणासाठी विशेष तरतूद करण्यात आलीय.

50 टक्के अनुसूचित जाती आणि 20 हजार आदिवासींची लोकसंख्या असलेल्या ब्लॉकमध्ये एकलव्य शाळा योजना सुरू करण्यात येणार आहे.

देशभरातल्या शाळांमध्ये साध्या फळ्याऐवजी लवकरात लवकर डिजिटल बोर्ड बसवण्यात येतील

तरूणांच्या आकांक्षा आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना हव्या असणाऱ्या बदलांना अर्थसंकल्पात जागा मिळालीय की नाही, हे जाणून घेण्यासाठी 2019च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाची वाट पाहावी लागेल.

First published: February 1, 2018, 6:04 PM IST

ताज्या बातम्या