मराठी बातम्या /बातम्या /देश /

स्पीकर झाला गुरुजींचा आवाज, भिंती झाल्या फळा; कोरोना काळातही शिक्षकांनी सोडला नाही ज्ञानदानाचा वसा

स्पीकर झाला गुरुजींचा आवाज, भिंती झाल्या फळा; कोरोना काळातही शिक्षकांनी सोडला नाही ज्ञानदानाचा वसा

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत यायला परवानगी नाही. पण शिक्षण थांबून कसं चालेल? म्हणून खेड्या-पाड्यातले शिक्षक परिस्थितीशी झुंज देत विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत यायला परवानगी नाही. पण शिक्षण थांबून कसं चालेल? म्हणून खेड्या-पाड्यातले शिक्षक परिस्थितीशी झुंज देत विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत यायला परवानगी नाही. पण शिक्षण थांबून कसं चालेल? म्हणून खेड्या-पाड्यातले शिक्षक परिस्थितीशी झुंज देत विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.

नवी दिल्ली, 28 डिसेंबर: कोरोनाच्या (Covid 19) संकटाचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला असून काही महिन्यांपासून शाळा ऑनलाईन (Online School) सुरु आहेत. त्याचबरोबर परीक्षा देखील ऑनलाईन होत आहेत. मागील 10 महिन्यांपासून शाळा बंद असून शिक्षक मात्र आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी विविध प्रयत्न करताना दिसून येत आहेत. शहरी भागांमध्ये शिक्षकांना सुविधा उपलब्ध असल्याने त्यांना तितक्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत नाही. परंतु ग्रामीण भागात सुविधांचा अभाव आणि विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती देखील बेताची असल्याने त्यांना ऑनलाईन शिक्षण (Online Education) घेण्यात मोठी अडचण येत आहे. पण शिक्षकांनीदेखील हार न मानता आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे अखंडित कार्य सुरु आहे. यामध्ये घराच्या भिंतीला फळा बनवणे असो, गाडीवरून लाऊडस्पीकरवर शाळा भरवणे असो किंवा अनेक भागांमध्ये शाळा आयोजित करण्यासारख्या गोष्टींमुळे शिक्षणाच्या दृष्टीने हे वर्ष सर्वांच्या लक्षात राहील.

अनेक ठिकाणी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन (Smartphone) नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरी जात त्यांच्या घराच्या भितींनाच फळा बनवत सामाजिक अंतर राखत शिक्षकांनी  शिकवलं. झारखंडच्या दुमरथार गावात सरकारी शाळेतील शिक्षकांनी अशाच पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना घरी जात शिकवण्याचं काम केलं.  यामुळं विद्यार्थ्यांना फायदा झाला आणि शिक्षकांनी देखील त्यांचे कर्तव्य पार पाडले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आणि इतर सुविधा नसल्याने त्यांना शिक्षण देण्यासाठी विविध नवीन मार्ग तयार करण्यात आले. आजही ग्रमीण भागातील अनेक जणांकडे कॉम्प्युटर(Computer) आणि स्मार्टफोन(Smartphone) नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणात अडथळा येत होता. त्याचबरोबर काही ठिकाणी स्मार्टफोन होते परंतु इंटरनेटच्या स्पीडमुळं ऑनलाईन शिक्षणात अडथळा निर्माण होत आहे.

शिक्षण आपल्या दारी योजना राबवली

अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन (Smartphone) नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेता येत नव्हते. यासाठी शिक्षकांनी थेट घरी जात त्यांना शिकवण्याचं काम केलं. झारखंडमधील शिक्षकांनी अशाचप्रकारे घरी जातंय शिकवण्याचं काम केलं. याविषयी माहिती देताना शिक्षक तपन कुमार यांनी याविषयी बोलताना सांगितलं, ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन (Smartphone) आणि इंटरनेट नव्हते त्यांना थेट घरी जाऊन आम्ही शिकवण्याचं काम केलं. अशाच पद्धतीने आम्ही या विद्यार्थ्यांच्या घरी त्यांच्या घराच्या भितींना फळा बनवत शिकवण्याचं काम केलं. शिक्षण आपल्या दारी या योजनेअंतर्गत शिक्षकांनी जवळपास 100 फळे तयार करत आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं. याच पद्धतीने सिक्कीममधील देखील रवंगला गावातीला विज्ञान आणि गणिताच्या शिक्षिका इंद्रा मुखी छेत्री या आठवड्याभरात जवळपास 40 विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत असत. यामध्ये त्या आठवड्याभरात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांशी थेट संपर्क करत त्यांना शिकवण्याचे काम करत असतं. त्या प्रत्येक विद्यार्थ्याला 20 मिनिटं वैयक्तिक शिकवण्याचं काम करत असत. या संकटाच्या काळात विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्यानं आणि ज्यांच्याकडे आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये आणि इतरांमध्ये भेदभाव न होण्यासाठी त्या थेट विद्यार्थ्यांकडे जात त्यांना शिकवण्याचं काम करत असत. आठवड्याभरासाठीचा अभ्यास त्या एकदाच त्यांना देत असत. त्यानंतर थेट दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांकडे येऊन त्यांना शिकवण्याचं काम करत केलं जाई.

गुजरातमध्ये ग्रामपंचायतीच्या लाउडस्पिकरची मदत

गुजरातमधील (Gujrat) अनेक गावांमध्ये शिक्षक ग्रामपंचायतीच्या लाउडस्पिकरच्या (Loud Speaker) मदतीने गावातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधत असत. याविषयी माहिती देताना गुजरातमधील जाननमधील शिक्षक घनश्यामभाई  स्पिकरवरून गोष्टी आणि कविता ऐकवत असत. यामध्ये कोणत्या वेळेला गावांमध्ये ते हजर आहेत याची देखील माहिती देत असत. त्यामुळं विद्यार्थी या काळात प्रत्यक्ष त्यांना येऊन भेटू शकत असत. तसेच लॉकडाउनच्या काळात पालकांनी आपल्या मुलांशी कसे वागावे याची माहिती देखील ते लाऊड स्पिकरवरून देत असत. यामुळं विद्यार्थ्यांना घरी बसल्या शिक्षण मिळत होते आणि शिक्षकांना देखील कोरोना संक्रमणाचा कोणताही धोका नव्हता. याच पद्धतीने हरियाणामध्ये देखील विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं जात असे.

हरियाणामधील कंवरसीका गावात शाळेतील घंटीप्रमाणे गाडीवर घंटी वाजवली जात असे. त्यानंतर विद्यार्थी गल्लीच्या तोंडाकडे तोंड करून बसत असत. यावेळी लाउडस्पिकरवर शिक्षकांचा आवाज आल्यानंतर प्रार्थना म्हणत ते दररोज एका विषयाचा अभ्यास करत असल्याची माहिती येथील शिक्षिका नूर बानो यांनी दिली.

अनेक ठिकाणी मोहल्ला क्लास

छत्तीसगड सारख्या दुर्गम राज्यात शिक्षकांनी मोहल्ला क्लास (Mohalla Class) ही संकल्पना राबवत थेट विद्यार्थ्यांच्या दारी जात त्यांना शिकवले. यासाठी त्यांनी अनेक सार्वजनिक ठिकाणी छोटे छोटे वर्ग भरवत मुलांना शिकवण्याचं काम केलं. अनेक शिक्षकांनी आपापल्या परीने युक्ती लढवत विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं. येथील शिक्षक रुद्र राणा हे मोटारसायकलवर जात शिकवण्याचं काम करत असे. अनेक गावांमध्ये इंटरनेट आणि मोबाईलची सुविधा नसल्याने मी मोटारसायकलवर एक छत्री आणि फळा घेऊन निघत असे. ज्या ठिकाणी जागा मिळत असे त्याच ठिकाणी मी विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत असल्याची माहिती त्यांना दिली. यामुळं शाळा थेट मुलांच्या घरी आल्यानं विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला.

First published:

Tags: Education, Teacher