Home /News /national /

कोणत्याही तांत्रिक शिक्षणाशिवाय, मेरठची मुलगी अमेरिकेत आहे यशस्वी उद्योजिका

कोणत्याही तांत्रिक शिक्षणाशिवाय, मेरठची मुलगी अमेरिकेत आहे यशस्वी उद्योजिका

क अशी उद्योजिका आहे, ज्यांनी कोणतंही तांत्रिक शिक्षण न घेताच आपल्या मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आज अमेरिकेतील सिलीकॉन व्हॅली येथे एका कंपनीच्या सीईओ आहेत. दिल्लीत राहणाऱ्या अर्जिता सेठी यांनी EdTech Startup ‘Equally’ मुळे जगभरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 10 एप्रिल : भारतील अनेक महिला उद्योजक आज जगभरातील अनेक देशात यशस्वी उद्योजिका, यशस्वी महिला म्हणून नावारुपास आल्या आहेत. एक अशी उद्योजिका आहे, ज्यांनी कोणतंही तांत्रिक शिक्षण न घेताच आपल्या मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आज अमेरिकेतील सिलीकॉन व्हॅली येथे एका कंपनीच्या सीईओ आहेत. दिल्लीत राहणाऱ्या अर्जिता सेठी यांनी EdTech Startup ‘Equally’ मुळे जगभरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अर्जिता यांची आई अलका यांनी दिल्लीत एक संस्था 'द स्कूल ऑफ इंग्लिश'ची स्थापना केली होती. ज्यात विद्यार्थ्यांना कम्यूनिकेशन, भाषा आणि टेक्नोलॉजी स्किलमध्ये व्यावसायिक ट्रेनिंग दिली जातं. अर्जिता यांनी वयाच्या 16 व्या आपल्या आईला अलका सेठी यांना त्यांची बिझनेस पार्टनर बनू शकते का असा प्रश्न केला होता. 'बिझनेस पार्टनर बनू शकते का' या प्रश्नावर अर्जिता यांच्या आईने त्यांना गंभीरतेने घेतलं. परंतु त्यासह त्यांनी अनेक अटीही ठेवल्या. अर्जिता यांना अशा गोष्टी सोडाव्या लागल्या, ज्या सामान्य टीनेजर करतात. त्यानंतर अर्जिता यांनी अतिशय गांभिर्याने काम सुरू केलं. सात वर्ष यावर काम केल्यानंतर, आमच्या संस्थेद्वारा जवळपास 1000000 विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं गेल्याचं अर्जिता यांनी सांगितलं. दिल्ली सोडल्यानंतर अर्जिता यांनी सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये आपल्या पतीसोबत अंशुल धवन यांच्यासोबत ‘Equally’ ची सह-स्थापना केली. हा एक EdTech स्टार्टअप आहे, जो शिक्षणासाठी 'ऑगमेंटेड रियलिटी' (AR) चा उपयोग करतो. ऑगमेंटेड रियलिटी एक असं तंत्रज्ञान आहे, ज्याद्वारे आसपासच्या वातावरणाशी मिळतं-जुळतं कंम्यूटर जनित वातावरण तयार केलं जातं. त्यांनी 'न्यू फाउंडर स्कूल' आणि 'इंडियारथ' नावाच्या दोन संस्था सुरू केल्या. 32 वर्षिय अर्जिता सॅन फ्रॅन्सिस्को स्टेट यूनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसरही आहेत. तेथे त्या ऑन्ट्रप्रनशिप क्रिएटिविटी अँड इनोवेशन आणि बिजनेस एथिक्स शिकवतात. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये जन्मलेल्या अर्जिता यांचं लहानपण उत्तर दिल्लीत एका पंजाबी कुटुंबात गेलं. शाळेनंतर दिल्लीच्या एका कॉलेजमध्ये त्यांनी फिजिकल थेरेपीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर लंडन अकॅडमी ऑफ म्युझिक अँड ड्रमॅटिक आर्ट्समधून थिएटरमध्ये डिप्लोमा कोर्स केला आणि त्यानंतर 2014 मध्ये हॉल्ट इंटरनॅशनल बिजनेस स्कूलमधून सोशल ऑन्ट्रप्रनशिपमध्ये मास्टर्स केलं.

  (वाचा - इथून पुढे भीक मागणं गुन्हा नसणार? SC नं महाराष्ट्रासह 5 राज्यांना मागितलं उत्तर)

  ‘Equally’ एक ऑगमेंटेड रियलिटी प्लॅटफॉर्म आहे. ज्यावेळी एखादं लहान मुल तांत्रिक उपकरणाचा वापर करतो, त्यावेळी तो हळू-हळू आपल्या जवळपासच्या वातावरण आणि लोकांशी एकरुप होऊ लागतो. ज्यावेळी पोकेमॉन गो आलं होतं, त्यावेळी ऑगमेंटेड रियलिटी लोकांना वेगळं करण्याऐवजी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होती. याच तंत्राचा वापर करुन त्यांनी पहिलं कमर्शियल उत्पादन डा विंची क्लब बनवलं. हा व्हिज्युअल एन्सायक्लोपीडियासह एक सोशल गेम आहे, जो मुलांना आपल्या मित्रांसोबत खऱ्या आयुष्यात एक्सप्लोर करण्याची संधी देतो. अनेक चढ-उतारांनंतर हे प्रोडक्ट यशस्वी झालं आणि त्यानंतर त्यांनी डा विंची क्लब लाँच केला. आतापर्यंत यात सात देशांतील जवळपास 15 हजार युजर्स सामिल झाले आहेत. ‘Equally’ जगभरातील 12 देशांमध्ये असून 20 हजारहून अधिक युजर्स यांच्या उत्पादनांचा वापर करतात. कोरोना काळात डा विंची क्लबद्वारा एक अॅप लाँच करण्यात आलं आणि त्याद्वारा होमस्कूलिंगचा पर्यायही सुरू करण्यात आला. याबाबत बोलताना अर्जिता यांनी सांगितलं की, मला पुरुषांच्या तुलनेत अधिक मेहनत घ्यावी लागली, कारण मी कोणत्याही तांत्रिक, टेक्नोलॉजी बॅगग्राउंडमधून आलेली नाही. आज मी सिलीकॉन व्हॅलीमध्ये एका तांत्रिक कंपनीची सीईओ आहे. स्टार्टअपमध्ये महिला गुंतवणूकदारांची कमी असते. परंतु या क्षेत्रात पुरुषांच्या वर्चस्वपेक्षा हा पॅटर्न समजण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या. महिलांनी या स्टार्टअप क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केल्यास महिलांचीही या क्षेत्रात भागीदारी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या