राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना EDचं समन्स

ED summons NCP leader Praful Patel : दिपक तलवार एव्हीएशन घोटाळा प्रकरणामध्ये ईडीचं प्रफुल्ल पटेल यांना समन्स.

News18 Lokmat | Updated On: Jun 1, 2019 03:51 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना EDचं समन्स

नवी दिल्ली, 01 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना EDनं समन्स बजावलं आहे. दिपक तलवार एव्हीएशन घोटाळा प्रकरणामध्ये EDनं हे समन्स बजावलं आहे. ईडीनं आपल्या समन्समध्ये 6 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास प्रफुल्ल पटेल यांना सांगितलं आहे.Loading...

दिपक तलवार एव्हीएशन घोटाळा प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल करताना प्रफुल्ल पटेल यांचं नाव समोर आलं होतं. दिपक तलवार हे प्रफुल्ल पटेल यांचे मित्र असल्याची देखील चर्चा आहेत. एअर इंडिया तोट्यात जाण्याशी संबंधित हे सारं प्रकरण आहे. केंद्रीय मंत्री असताना प्रफुल्ल पटेल यांनी दिपक तलवार यांना विशेष सुट दिल्याचा आरोप आहे. ईडीनं बजावलेल्या नोटीसीनुसार 6 जून रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात प्रफुल्ल पटेल यांची चौकशी केली जाणार आहे. यावेळी ईडीचे मोठे अधिकारी देखील हजर असणार आहेत.

मीटींग सोडून निघाले प्रफुल्ल पटेल

दरम्यान, ईडीनं पाठवलेल्या नोटीसीबद्दल कळताच प्रफुल्ल पटेल पक्षाची मीटींग सोडून निघाल्याची माहिती देखील आता समोर येत आहे. मुंबईमध्ये पक्षाच्या सुरू असलेल्या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल सकाळपासून हजर होते.

गोंदियाच्या प्रचार सभेत मोदींनी दिला होता इशारा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरनम्यान गोंदियाच्या प्रचार सभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षरित्या प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य केलं होतं. आपल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही नेत्यांना तिहार जेलची चिंता सतावत असल्याचं विधान केलं होते. त्यावेळी देखील तो नेता कोण? याबाबत प्रसारमाध्यमं, समाजमाध्यमांवर याबाबत चर्चा रंगली होती.


VIDEO: नाशिकच्या गोदावरीत अजय देवगणने केलं वडिलांचं अस्थी विसर्जन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2019 03:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...