Home /News /national /

मोठी बातमी! फारुख अब्दुल्लांवर ED ची कारवाई; क्रिकेट घोटाळाप्रकरणी 12 कोटींची संपत्ती जप्त

मोठी बातमी! फारुख अब्दुल्लांवर ED ची कारवाई; क्रिकेट घोटाळाप्रकरणी 12 कोटींची संपत्ती जप्त

ED ने जम्मू - कश्मीर क्रिकेट असोसिएशन (JKCA) घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांची संपत्ती जप्त केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी पाहा सविस्तर वृत्त.

    श्रीनगर, 19 डिसेंबर : ईडीने (ED सक्तवसुली संचालनालय)  जम्मू - कश्मीर क्रिकेट असोसिएशन घोटाळा (JKCA) प्रकरणी मोठी कारवाई करत माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांची (Far) संपत्ती जप्त केली आहे. जम्मू कश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या फंडामध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी याआधी ऑक्टोबर महिन्यातच अब्दुल्ला ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. आता त्यांची तब्बल 12 कोटींची संपत्ती ED ने जप्त केली असल्याची माहिती समोर येत आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये  अब्दुल्ला यांची 3 घरं, 2 प्लॉट आणि एका कमर्शियल प्रॉपर्टीचा समावेश आहे.  ईडीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी याबद्दलची माहिती दिली आहे. काय आहे प्रकरण - या घोटाळ्याप्रकरणी ईडीने यापूर्वीदेखील तब्बल ६ तास फारुक अब्दुल्ला यांची चौकशी केली आहे. जम्मू कश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील कथित ११३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचं हे प्रकरण खूप जूनं आहे. याबाबत असा आरोप आहे, की यात तब्बल ४३.६९ कोटींचा घोटाळा झाला होता. याशिवाय हे पैसे खेळाडूंवरही खर्च केले गेले होते. सुरुवातीला या प्रकरणाची चौकशी जम्मू कश्मीर पोलीस करत होते. मात्र, नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं गेलं होतं. मात्र, प्रकरण मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असल्याने कालांतराने या संपूर्ण प्रकरणात ईडीचाही प्रवेश झाला. काय आहे सीबीआयचं म्हणणं - सीबीआयच्या म्हणण्यानुसार, फारुक अब्दुल्ला हे जम्मू कश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना पैशांचा घोटाळा झाला होता. याप्रकरणी फारुक अब्दुल्ला यांच्यासह क्रिकेट असोसिएशनचे माजी महासचिव मोहम्मद सलीम खान, माजी कोषाध्यक्ष अहसान अहमद मिर्जा आणि जम्मू कश्मिर बँकेचा एक कर्मचारी बशीर अहमद मिसगर हेदेखील आरोपी आहेत. या सर्वांवर कट रचण्याचा आणि विश्वासघाताचा आरोप आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Jammu kashmir

    पुढील बातम्या