लालू प्रसाद यांच्या मुलीच्या घरावरही 'ईडी'चे छापे !

लालू प्रसाद यांच्या मुलीच्या घरावरही 'ईडी'चे छापे !

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय.

  • Share this:

पाटना, 8 जुलै : सीबीआयपाठोपाठ आता ईडीदेखील लालू प्रसाद यादव कुटुंबियांमागे हात धुवून मागे लागलंय. आज सकाळीच लालू प्रसाद यांची मुलगी मिसा भारती आणि त्यांचे जावई यांच्या घरावर ईडीने छापे टाकले. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. कालच सीबीआयने लालू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती. त्यानंतर आज आता लालूंच्या नातेवाईकांनाही लक्ष्य केलं जातंय. काल एकूण 12 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होते.

2006साली रेल्वेमंत्री असताना लालू प्रसाद यांनी एका खासगी कंपनीला आयआरटीसीचं कंत्राट देताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप सीबीआयने ठेवलाय. या कारवाईविरोधात लालूंनी काल दिवसभरात तीन वेळेस पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पण तरीही सीबीआय आणि ईडीची कारवाई काही थांबलेली नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या इशाऱ्यावरून ही कारवाई केली जात असल्याचा आरोप लालू यांनी केलाय.

सीबीआयने काल तब्बल साडेपाच तास राबडी देवी आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजप्रताप यादव यांची कसून चौकशी केली. बिहारचे थेट उपमुख्यमंत्री चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने नितीश कुमारचं सरकारही अडचणीत आल्याचं बोललं जातंय. दरम्यान, नितीशकुमारांनी मात्र, सीबीआयच्या कारवाईबाबत जाणिवपूर्वक मौन बाळगणंच पसंत केलंय. तर काँग्रेसने सुडाच्या भावनेतून लालूंना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केलाय.

First published: July 8, 2017, 11:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading