प्रफुल पटेलांना ईडीची दुसरी नोटीस, अडचणी वाढणार

मध्यस्त असलेल्या दीपक तलवारने आपल्या संबंधांचा वापर करून विदेशी कंपनीला फायदा पोहोचवला त्यामुळे एअर इंडियाचं नुकसान झालं असा आरोप होतोय.

News18 Lokmat | Updated On: Jun 8, 2019 06:06 PM IST

प्रफुल पटेलांना ईडीची दुसरी नोटीस, अडचणी वाढणार

नवी दिल्ली 8 जून : विमान खरेदी घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या अडचणी वाढणार आहे. या प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीने पटेलांना दुसरी नोटीस पाठवलीय. युपीएच्या काळात 2004 ते 2011 या काळात पटेल हे नागरी उड्डयन मंत्री असताना या घोटाळ्याचा आरोप झाला होता. त्यामुळे पटेलांची चौकशी करणं महत्त्वाचं असल्याचं ईडीने म्हटलं आहे.

या आधीही ईडीने पटेलांना चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. 6 जूनला हजर राहावं असं त्यांना सांगण्यात आलं होतं. मात्र पटेलांनी दुसरी तारीख मागितली होती त्यामुळे त्यांना दुसरी नोटीस पाठवण्यात आलीय. 10 किंवा 11 जूनला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदारही आहेत.



काय आहे प्रकरण?

Loading...

या प्रकरणातला दलाल दीपक तलवार हा सध्या तिहारच्या तुरुंगात आहे. त्याच्यावर जे आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं त्यातही पटेलांचं नाव होतं. मात्र त्यांना आरोपी करण्यात आलेलं नाही. 2006 मध्ये एअरबस या कंपनीकडून 43 विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा समितीने मंजूर केला होता. या करारानुसार कंपनीने 1 हजार कोटींची गुंतवणूक भारतात करणं अपेक्षीत होतं.

यात विमानांच्या देखभालीचं केंद्र, प्रशिक्षणाची व्यवस्था आणि इतर काही गोष्टींचा समावेश होता. मात्र या प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा करारच रद्द करून टाकला होता. मध्यस्त असलेल्या दीपक तलवारने आपल्या संबंधांचा वापर करून विदेशी कंपनीला फायदा पोहोचवला त्यामुळे एअर इंडियाचं नुकसान झालं असा आरोप होतोय.

मध्यस्त दीपक तलवार आणि प्रफुल पटेल यांच्यात चांगले संबंध होते,त्याचाच फायदा घेण्यात आल्याचा ईडीचा संशय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2019 06:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...