ED चा आणखी एक दणका, या 90 वर्षांच्या काँग्रेस नेत्याविरुद्ध तक्रार दाखल

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यानंतर आता आणखी दोन काँग्रेस नेत्यांना ED ने दणका दिला आहे. AJL जमीनवाटप प्रकरणी ED ने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2019 07:57 PM IST

ED चा आणखी एक दणका, या 90 वर्षांच्या काँग्रेस नेत्याविरुद्ध तक्रार दाखल

दिल्ली, 26 ऑगस्ट : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यानंतर आता आणखी दोन काँग्रेस नेत्यांना ED ने दणका दिला आहे. AJL जमीनवाटप प्रकरणी ED ने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पंचकुलामधल्या AJL-नॅशनल हेरॉल्ड जमीनवाटप प्रकरणी या दोन नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड या कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप भूपिंदर सिंग हुडा यांच्यावर आहे.

याआधीही भूपिंदर सिंग हुडा यांची याचप्रकरणी ED ने चौकशी केली होती. AJL ही कंपनी नेहरू- गांधी कुटुंबातल्या सदस्यांसह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून चालवली जाते, असं म्हटलं जातं. हीच कंपनी नॅशनल हेरॉल्ड हे वर्तमानपत्र काढत होती. AJL कंपनीला या जमीनवाटपात आर्थिक फायदा झाला, असा आरोप आहे.

असे व्हा श्रीमंत : रोज 50 रु. वाचवा आणि 10 लाख रुपये मिळवा

याच प्रकरणामध्ये ED ने काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांचीही चौकशी केली होती. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले मोतीलाल व्होरा सध्या ९० वर्षांचे आहेत.या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे अनेक अधिकारी आणि नेते अडचणीत आले होते.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांची CBI कोठडीत रवानगी केलेली असताना या दोन नेत्यांच्या ED चौकशीमुळे काँग्रेस अडचणणीत आलं आहे.

2007 मध्ये पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना या बेकायदेशीर परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली, असा आरोप होता. 15 मे 2017 ला CBI ने FIPB मध्ये झालेल्या अनियमततेबद्दल तक्रारही दाखल केली होती.याच वेळी या खटल्यात पहिल्यांदा पी. चिदंबरम यांचं नाव आलं.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, FIPB कडून परकीय गुंतवणुकीला परवानगी मिळवण्याबद्दल INX मीडिया चे संचालक इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांनी एका वरिष्ठ नेत्याची भेट घेतली. इंद्राणी मुखर्जीने हे वरिष्ठ नेता पी. चिदंबरम आहेत, असं CBI ला सांगितलं होतं.

=====================================================================================================

VIDEO : काश्मीरच्या मुद्यावर मध्यस्थी करणाऱ्या ट्रम्प यांना मोदींनी दिला इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 07:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...