ED आणि CBI करणार कारवाई; या मोठ्या नेत्याला होऊ शकते अटक

ED आणि CBI करणार कारवाई; या मोठ्या नेत्याला होऊ शकते अटक

सक्तवसुली संचालनालय म्हणजे ED ने देशभरातल्या अनियमित उद्योगांवरचे फास आवळायला सुरुवात केली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : सक्तवसुली संचालनालय म्हणजे ED ने देशभरातल्या अनियमित उद्योगांवरचे फास आवळायला सुरुवात केली आहे आणि यातून बडे नेतेही सुटलेले नाहीत. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. दिल्ली हायकोर्टाकडूनही दिलासा न मिळाल्यामुळे त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. चिदंबरम यांच्याविरोधात CBI आणि ED यांच्या केस दाखल आहेत.

माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना दिल्ली हायकोर्टाने झटका दिला. त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. 2007 मध्ये ते UPA संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री असताना INX media ला 305 कोटींचा परकीय निधी मिळाला.

हे वाचा  - EDच्या नोटीसवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांना दिला हा आदेश

त्यामध्ये परकीय गुंतवणूक संवर्धन महामंडळ  FIPB ची मंजुरी मिळवण्यात अनियमितता दिसल्याचा आरोप चिदंबरम यांच्यावर आहे. आयएनएक्स मीडिया कंपनीचे तत्कालीन संचालक इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांच्यावरही याप्रकरणी आरोप आहेत.

हे वाचा : राष्ट्रवादीला मोठा धक्का? छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर, मुंबईत तातडीने बोलावले

या प्रकरणात 10 लाख रुपये घेतल्याचा आरोप चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरमवर लावण्यात आला होता. याप्रकरणी कार्तीला अटकही करण्यात आली होती. 15 मे 2017 रोजी या प्रकरणी सीबीआयने केस दाखल केली होती. महाराष्ट्रात मनसे नेते राज ठाकरे यांनाही ED ने नोटीस बजावली आहे. त्यांची येत्या 22 ऑगस्टला चौकशी होईल.

----------------------------------

...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: August 20, 2019, 3:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading