नीरव मोदीवर मोठी कारवाई, 637 कोटींची मालमत्ता जप्त

नीरव मोदीवर मोठी कारवाई, 637 कोटींची मालमत्ता जप्त

पीएनबीच्या माध्यमातून देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा करणारा आरोपी नीरव मोदीवर आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई,01 ऑक्टोबर : पीएनबीच्या माध्यमातून देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा करणारा आरोपी नीरव मोदीवर आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत नीरव मोदीची 637 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

पीएमएलएअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्या 216 कोटींच्या दोन स्थावर मालमत्ता आणि संपत्तीही जप्त करण्यात आली आहे.

नीरव मोदीवरच्या या सगळ्यात मोठ्या कारवाईमध्ये त्याची 637 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पीएमएलएअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

216 कोटींच्या दोन स्थावर मालमत्तांचाही या कारवाईमध्ये समावेश आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात त्याची न्यूयॉर्कमधील मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे.

या सगळ्याबरोबरच नीरव मोदीच्या 5 परदेशी बँक खाती सिल करण्यात आली आहेत. ज्यात तब्बल 278 कोटी रुपये आहेत.

तर 22.69 कोटी रुपये किंमत असलेले हीरे आणि दागिने हे ईडीने हाँगकाँगमधून भारतात आणले आहेत. दक्षिण मुंबईमध्ये असलेला 19.5 कोटीचं घरही या कारवाईमध्ये जप्त करण्यात  आलं आहेृ.

दरम्यान, लोकसभेने जारी केलेल्या नव्या विधेयकाच्या कायद्यानुसार, आता विदेशात पळून गेलेल्यांवर भारतीय काद्यानुसार कारवाई करण्याचे अधिकार तपास यंत्रणांना देण्यात आले. या नव्या काद्यानुसार नीरव मोदीवर ही कारवाई करणं सोपं झालं असल्याचं सांगण्यात येत आहे.

VIDEO : रिक्षाचालकानं चक्क पोलिसाच्याच डोक्यात घातली मातीची कुंडी!

First published: October 1, 2018, 1:30 PM IST

ताज्या बातम्या