PMC बँक घोटाळा: EDचा मोठा दणका, 100 कोटींची संपत्ती केली जप्त

PMC बँक घोटाळा: EDचा मोठा दणका, 100 कोटींची संपत्ती केली जप्त

आत्तापर्यंत HDILशी संबंधित 360 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 18 सप्टेंबर: पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (Punjab & Maharashtra Co-operative Bank) घोटाळा प्रकरणात EDने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात शुक्रवारी EDने 100 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. या घोटाळ्यात आरोप असलेले राकेश वाधवान (Rakesh Wadhwan) आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान (Sarnag Wadhwan) यांची ही संपत्ती आहे. वाधवान हे हाउसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे (Housing Development and Infrastructure Liminted) संचालक आहेत.

HDILच्या दिल्लीतल्या तीन हॉटेल्सला EDने सील ठोकलं आहे. बाजारात या हॉटेल्सचं मुल्य हे तब्बल 100 कोटी रुपये एवढं आहे. आत्तापर्यंत HDILशी संबंधित 360 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

या आधी EDने ऑक्टोबर 2019मध्ये HDILच्या मुंबईतल्या 6 ठिकाणी छापे घातले होते. त्यात कंपनीच्या रोल्स रॉयस (Rolls Royce), रेंज रोव्हर (Range Rover) आणि बेंटली (Bentley ) सह 12 अलिशान गाड्या जप्त केल्या होत्या.

PMC बँकेचे अधिकारी आणि HDIL च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरव्यवहारामुळे 4 हजार 355 कोटींचं नुकसान झालं, असं आढळून आलं होतं.

युती केली हे चुकलं, नाही तर भाजपला 150 पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या- फडणवीस

4 हजार 355 कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप होत असून या प्रकरणी HDIL चे संचालक राकेश वाधवान(Rakesh Wadhawan ) आणि त्यांचा मुलगा सारंग यांच्या विरुद्ध मनिलॉड्रींगचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

ED (Enforcement Directorate )ने वाधवान यांच्या जवळच्या लोकांवर  छापे टाकले आहेत. त्या छाप्यांमध्ये अनेक खळबळजनक गोष्टी बाहेर आल्या आहेत. या छाप्यांमध्ये ED च्या हातात अनेक धक्कादायक गोष्टी हाती लागल्या आहेत.

कोरोनाची सौम्य लक्षणं म्हणून स्वत:हून HOME ISOLATE होणं ठरू शकतं जीवघेणं

घोटाळ्यानंतर आरबीायने या बँकेवर निर्बंध लादले होते. त्यामुळे खातेदारांना प्रचंड संकटांचा सामना करावा लागला होता. आता हे निर्बंध काहीसे शिथिल झाले आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 18, 2020, 10:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या