लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ , मुलगी मिसाच्या सीएला ईडीने केली अटक

लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ , मुलगी मिसाच्या सीएला ईडीने केली अटक

  • Share this:

23 मे : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात लालूप्रसाद यादव यांची ज्येष्ठ कन्या आणि राज्यसभा खासदार मिसा भारतींच्या सीए राजेश अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे  मिसा भारती यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हजारो कोटींची बेनामी मालमत्ता जमवल्याचा आरोप भाजपचे बिहारमधील नेते सुशीलकुमार मोदी यांनी गेल्या आठवड्यात केला होता. त्यानंतर आयकर विभागाने दिल्ली, गुरुग्राम आणि पाटणा इथल्या लालू प्रसाद यादव यांच्या 22 ठिकाणांच्या मालमत्तेवर छापे टाकले होते. लालूंवर 1 हजार कोटीच्या गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, लालूंचे निकटवर्तीय प्रभूनाथ सिंह जेडीयू आमदाराच्या हत्येप्रकरणी दोषी आढळले आहेत. त्यानंतर आता मिसा यादव यांच्या सीएला अटक करण्यात आल्यामुळे हा लालूंना एक मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2017 04:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading