मुंबई, 16 एप्रिल : तबलिगी जमातचे (Tabligi Jamat) प्रमुख मौलाना साद यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. साद यांच्याविरोधात PMLA (Prevention of Money Laundering Act) अंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे.
यावेळी ED तबलिगी जमातला दिल्या जाणाऱ्या निधीबाबत (Funding) तपासणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी मौलाना साद यांच्यासह 9 जणांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. मरकजमध्ये गर्दी जमवून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर आधीच गुन्हे दाखल करण्यात आले होते.
खालील बाबींवर ED कडून केली जाणार तपासणी
- मरकजमध्ये हजारो लोक राहत होते. यावेळी त्यांच्या राहण्या-खाण्यासाठी कुठून निधी दिला जात होता.
- मरकजमध्ये भारतातील अनेक राज्यांतून आणि परदेशातून मोठ्या संख्येने लोक आले होते. यावेळी त्यांना कोणी स्पॉन्सर केलं वा त्यांच्या प्रवासाचा खर्च कोणी व कसा दिला?
- मरकज सोडल्यानंतर अनेक लोक भारतातील विविध भागांमधील मशिदीत लपून होते. त्यांनी दिल्ली ते विविध भागांतील मशिदींपर्यंत प्रवास कसा केला? त्यांचा बस, हवाई वाहतूक, टॅक्सीचा खर्च कोणी केला?
- मिळालेल्या माहितीनुसार दैंनदिन व्यवहारात जमात कॅशचा वापर करीत होते. ही कॅश कशी मिळाली याचा ईडीकडून तपास केला जाणार आहे.
- तबलिगी जमातला परदेशी फंड मिळत होता का? याचाही ईडीकडून तपास केला जाणार आहे.
9 people including Maulana Saad (Tablighi Jamaat Chief) is on Enforcement Directorate (ED) radar. ED will also investigate the trust of Maulana Saad and transactions of trust will also be investigated: Sources https://t.co/cG8jJ5ydxm
— ANI (@ANI) April 16, 2020
मार्च महिन्यात दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या कार्यक्रमात देश विदेशातून हजारो लोक जमले होते. देशभर लॉकडाऊनची स्थिती असताना एवढ्या लोकांना मशिदीत ठेवल्यामुळे देशभर वादळ निर्माण झालं होतं. या कार्यक्रमाला अनेक देशांमधून प्रचारक आल्याने तिथे असलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली.
संबंधित -धोक्याची घंटा! मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 2000 पार, आज 107 नवे रुग्ण दाखल
IPS बायको कोरोनाशी लढतेय तर सध्या नवरा काय करतोय? SP पत्नीने शेअर केला VIDEO
संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.