भारतात 'नकुशी' मुलींची संख्या 2 कोटी 10 लाख!

भारतात 'नकुशी' मुलींची संख्या 2 कोटी 10 लाख!

नकोशी मुली म्हणजे, ज्या आईवडिलांना मुलगा हवा असतो पण त्यांना मुलगी होते.

  • Share this:

30 जानेवारी : सोमवारी संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये, एका अशा सर्वेक्षणाचा उल्लेख आहे जो खूप धक्कादायक आहे. यात भारतातील नकोशी मुलींच्या संख्येचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नकोशी मुली म्हणजे, ज्या आईवडिलांना मुलगा हवा असतो पण त्यांना मुलगी होते.

या सर्वेनुसार 2 कोटी 10 लाख मुली नकोशी असल्याचं सांगण्यात आलं आहे. ही संख्या सेक्स रेशो ऑफ लास्ट चाईल्ड या कंपनीच्या आधारे सांगण्यात आली आहे. या सर्वेक्षणानुसार आणि या इतक्या मोठ्या संख्येनुसार हे स्पष्ट होतं की, जोपर्यंत मुलगा होतं नाही तोपर्यंत पालक मुलींना जन्म देत असतात.

तसं तर लिंगतपासणीसाठी बंदी आहे. पण तरीही लिंग तपासणी दरम्यान प्रत्येक मुलामागे मुलींची संख्या कमी आहे. असं सर्वेक्षणात दिसून आलं आहे. या सर्वेक्षणानुसार असं सांगण्यात आलं की, याचा महिलांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे.

2005 ते 2016मध्ये महिलांच्या गुणोत्तराची संख्या 36 टक्क्यांवरून थेट 24 टक्क्यांवर आली आहे. म्हणजेच महिलांच्या विकासासाठी भारत सगळ्यात मागे आहे.

First published: January 30, 2018, 1:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading