PM मोदींनी भाषणासाठी परवानगी घेतली नव्हती- निवडणूक आयोग

PM मोदींनी भाषणासाठी परवानगी घेतली नव्हती- निवडणूक आयोग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणासंदर्भात निवडणूक आयोग आज शुक्रवारी निर्णय घेणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 मार्च: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणासंदर्भात निवडणूक आयोग आज शुक्रवारी निर्णय घेणार आहे. भारताच्या मिशन शक्तीच्या यशाची माहिती देण्यासाठी मोदी यांनी 27 मार्च रोजी संवाद साधला होता. मोदींनी आचार संहितेचे उल्लंघन केले नाही ना यासंदर्भात आयोगाकडून चौकशी केली जात आहे. यासंदर्भात आयोगाने एका समितीची नियुक्ती केली आहे. तसेच दुरदर्शन आणि आकाशवाणीकडून संबंधित भाषणाचे फीड आणि माहिती मागवण्यात आली आहे.

मोदींच्या भाषणासंदर्भात विरोधी पक्षांनी केलेल्या तक्रारीनंतर बुधवारी उप निवडणूक आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना करण्यात आली. ही समिती मोदींच्या भाषणाची चौकशी करेल. विरोधी पक्षांच्या मते मोदींनी त्यांच्या भाषणात सरकारच्या कामाचा उल्लेख केला. त्याच्या भाषणात राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही गोष्ट नव्हती.

निवडणूक आयोग समिती शुक्रवारी संध्याकाळपर्यंत चौकशी पूर्ण करेल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय दिला जाईल असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, समितीमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान कार्यालयाने मोदींच्या भाषणासंदर्भात, मिशन शक्ती संदर्भात कोणतीही कल्पना दिली नव्हती तसेच यासाठी परवानगी देखील मागितली नव्हती. अर्थात यासंदर्भात आयोगाने अद्याप पंतप्रधान कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण मागितले नाही.

उप-निवडणूक आयुक्त संदीप सक्सेना यांनी दुरदर्शन आणि आकाशवाणीकडून पंतप्रधानांच्या भाषणाचे फीड मागवले आहेत. मोदींच्या भाषणासंदर्भात युट्यूबकडून काही स्पष्टीकरण मागणार का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. कारण मोदींच्या भाषणाचे मुख्य फीड युट्यूबवरुन देण्यात आले होत.

SPECIAL REPORT : पार्थ पवारांचा मावळ जिंकण्याचा मनसुबा, काँग्रेसची नाराजी महागात पडणार?

First published: March 29, 2019, 7:15 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading