देशाच्या इतिहासात निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, पश्चिम बंगालमध्ये एक दिवसापूर्वीच प्रचारबंदी

देशाच्या इतिहासात निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, पश्चिम बंगालमध्ये एक दिवसापूर्वीच प्रचारबंदी

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत निवडणूक आयोगानं नाराजी व्यक्त करत मोठी कारवाई केली आहे.

  • Share this:

कोलकाता, 15 मे : पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत निवडणूक आयोगानं नाराजी व्यक्त करत मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी (14 मे) कोलकातामध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं कठोरातील कठोर पाऊल उचललं आहे. निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी (16 मे) रात्रीपासूनच प्रचारबंदी लागू केली आहे. या कारवाईनुसार रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही पक्षाला येथे प्रचार करता येणार नाही. लोकसभा निवडणूक 2019च्या अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया 19 मे रोजी पार पडणार आहे. पण पश्चिम बंगालमधील हिंसाचार पाहता आयोगानं 17 मे ऐवजी 16 मे रोजीच प्रचारबंदी लागू केली आहे.

वाचा :VIDEO : भाजपला उत्तर देत ममतादीदीही उतरल्या रस्त्यावर

कलम 324 अंतर्गत निवडणूक आयोगानं ही कारवाई केली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोगानं केलेली ही मोठी कारवाई असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.  याव्यतिरिक्त निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालच्या मुख्य आणि गृह सचिवांचीही पदावरून गच्छंती केली आहे.

वाचा :वाराणसीतील रोड शोमध्ये प्रियंका गांधींच्या डोक्याला दुखापत

कोलकात्यात अमित शहांच्या गाडीवर हल्ला, भाजप आणि तृणमूलमध्ये तुफान राडा

मंगळवारी कोलकात्यामध्ये अमित शहांच्या रोड शोदरम्यान त्यांच्या वाहनावर हल्ला झाल्याने तुफान राडा झाला. तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, दगडफेक झाली. अनेक ठिकाणी जाळपोळही करण्यात आली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं होतं. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

भाजपने अमित शहा यांच्या रोड शोची कोलकात्यात घोषणा केल्यापासूनच तृणमूल आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली होती. सात किलोमीटरच्या या रोड शोला सुरुवातीला परवानगी दिली गेली नाही. अगदी शेवटच्या क्षणी रोड शोला परवानगी मिळाली होती. रोड शो सुरू झाल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले त्यानंतर संघर्षाला सुरुवात झाली.

दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने वातावरण चिघळलं. त्यातच अमित शहा आणि भाजपचे नेते ज्या गाडीवर उभे होते त्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याने वातावरण आणखीच तापलं. यादरम्यान, पोलिसांनी अमित शहा आणि इतर नेत्यांना सुरक्षित पुढे नेलं.

VIDEO: 'तू झक्कास दिसतेस' म्हणताच तरुणीने युवकाला चपलेनं धुतलं

First published: May 15, 2019, 7:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading