#BattleOf2019 या APP वर तुम्ही करू शकता निवडणुक आयोगाकडे तक्रार

#BattleOf2019 या APP वर तुम्ही करू शकता निवडणुक आयोगाकडे तक्रार

ते सर्व पुरावे आयोग संबंधित अधिकाऱ्यांना पाठवते आणि त्याची चौकशी झाल्यानंतर आयोग कारवाईचा निर्णय घेऊ शकते.

  • Share this:

नवी दिल्ली 10 मार्च  : देशात निवडणुकांची घोषणा झाली आहे. आयोगाने निवडणूक तारखांची घोषणा केल्यानंतर त्याच वेळी देशात आदर्श आचार संहिता लागू होते. या आचार संहितेचं पालन करणं हे प्रत्येक राजकीय पक्षांवर बंधनकारक आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांनाही त्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं. या काळात देशाच्या मुख्य निवडणुक आयुक्तांना सर्वात जास्त अधिकार असतात. राजकीय पक्ष किंवा उमेदवारांबद्दल काही तक्रार असल्यास 'citizens vigil' या APP वर तुम्ही निवडणूक आयोगाकडे थेट तक्रार करू शकता.

निडणुकीच्या काळात खास नागरिकांसाठी आयोगाने हे APP तयार केलं आहे. तुम्ही हे APP स्मार्टफोनवर डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर त्या APPवर तुम्ही आयोगाकडे तक्रार करू शकता. फोटो, व्हिडीओ आणि काही कागदपत्र या APP च्या माध्यमातून पाठवता येवू शकतात. आयोग तक्रार कर्त्याचं नाव गुप्त ठेवू शकते. ते सर्व पुरावे आयोग संबंधित अधिकाऱ्यांना पाठवते आणि त्याची चौकशी झाल्यानंतर आयोग कारवाईचा निर्णय घेऊ शकते.

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकांची अखेर घोषणा झाली.  देशात सात  या टप्प्यात निवडणुका होणार असून महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेलं  महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. त्यामुळं महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा सर्वच पक्षांचा प्रयत्न आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिल, चौथ्या टप्प्यातील मतदान 29 पाचव्या टप्प्यातील मतदान 6 मे सहाव्या टप्प्यातील मतदान 12 मे आणि सातव्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी होणार आहे. तर, 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

First published: March 10, 2019, 7:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading