'बाबरी मस्जिद आम्ही पाडली, तिथेच मंदिर बांधणार',ECकडून साध्वी प्रज्ञांना नोटीस

'बाबरी मस्जिद आम्ही पाडली, तिथेच मंदिर बांधणार',ECकडून साध्वी प्रज्ञांना नोटीस

लोकसभा निवडणुकीतील भोपाळ येथील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी पुन्हा वादग्रस्त विधान करून नवीन वाद निर्माण केला आहे.

  • Share this:

भोपाळ, 21 एप्रिल : लोकसभा निवडणुकीतील भोपाळ येथील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी पुन्हा वादग्रस्त विधान करून नवीन वाद निर्माण केला आहे. साध्वी प्रज्ञा यांनी शनिवारी (20 एप्रिल) एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, 'निश्चित स्वरूपात राम मंदिर बांधण्यात येणार असून हे एक भव्य मंदिर असेल.' यानंतर मंदिर उभारण्यासाठीच्या वेळमर्यादेबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रज्ञा यांनी सांगितले की, 'आम्ही मंदिर बांधणार. शेवटी (बाबरी मस्जिद)ढाचा उद्ध्वस्त करण्यासाठी आम्हीच तेथे गेलो होतो'.

त्यांच्या या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. साध्वी प्रज्ञा यांनी बाबरी मस्जिदसंदर्भात आपल्या भूमिकेवर प्रकाश टाकत म्हटलं की, ' मी बाबरी मशिदीवर चढून ती पाडण्यासही मदत केली होती. मी चढाई करून ढाचा तोडला. हे काम करण्यासाठी देवानं मला संधी दिली, याचा मला अभिमान आहे. मला शक्ती मिळाली आणि मी ते काम पूर्ण केलं. आता त्याच जागेवर राम मंदिर उभारणार.'या विधानामुळे साध्वी प्रज्ञा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

या विधानाची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी साध्वींना नोटीस बजावण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकारी वी.एल. कांता राव यांनीही सर्वच राजकीय नेत्यांना चेतावणी दिली आहे.

'वारंवार आचार संहितेचं उल्लंघन केल्यास आणि अपमानकारक भाषेचा प्रयोग केल्यास कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल',असा इशारा राव यांनी दिला आहे. यापूर्वी साध्वी प्रज्ञा यांनी 2008मध्ये मुंबई हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं.

वाचा अन्य बातम्या

कोलंबोमध्ये साखळी बॉम्बस्फोट; भीषण स्फोटाचा VIDEO समोर

साखळी बॉम्बस्फोटांनी श्रीलंका हादरले! 100 जणांचा मृत्यू, 450 जखमी

VIDEO: ...मलाच माझी वाटते लाज: उदयनराजे

SPECIAL REPORT: हातकणंगलेच्या जनतेचा कौल कुणाला? कोण मारणार बाजी?

First published: April 21, 2019, 11:12 AM IST

ताज्या बातम्या